संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या वादग्रस्त कांदबरीवर आधारित चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंगयांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत, संजय बारुयांच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहेत. पण कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा निषेध केला.कोलकात्तामध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा पडदा फाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे नाव चुकीचे आहे,
मनमोहन सिंग सारख्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान झाल्याचं मत काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.
INTOLERANCE. Screen torn in a multiplex in Kolkata where #TheAccidentalPrimeMinister was being screened. @MamataOfficial @derekobrienmp pic.twitter.com/5rVAghSihN
— Anupam Kher (@AnupamPKher) January 11, 2019
‘कोलकात्तामधील चित्रपटगृहात काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले फार चुकीचे आहे. शो रद्द होण्यासाठी कोलकात्ता चित्रपटाचा पडदा फाडण्यात आला.ही असहिष्णुता आहे’, असं मत अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. बंगालच्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष शादाब खान यांनी नावातून चित्रपट निर्मात्यांना नक्की सांगायचं तरी काय आहे ? असे त्याचे मत आहे. कोलकातामध्ये १०० कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांबाहेर आपला सहभाग नोंदविला होता.