Oscars2020 Live : And the Oscar goes to... पाहा कोण ठरले पुरस्काराचे मानकरी

पाहा या सेलिब्रिटींचे अफलातून स्टाईल स्टेटमेंट

Updated: Feb 10, 2020, 10:32 AM IST
Oscars2020 Live : And the Oscar goes to... पाहा कोण ठरले पुरस्काराचे मानकरी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतात दिवसही उजाडलेला नसताना साता समुद्रापलीकडे, एका अशा दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली ज्याची साऱ्या कलाविश्वाला प्रतिक्षा लागून राहिली होती. हा दिमाखदार सोहळा म्हणजे यंदाचे द अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात Oscars 2020. 

ऑस्करचा मुख्य पुरस्कार सोहळा सुरु होण्यापूर्वी रेड कार्पेट शोला सुरुवात झाली आहे. रेड कार्पेटवर अक्षरश: सारं कलाविश्व एकवटलं आहे. विविध चित्रपटांतील कलाकार, तंत्रज्ञ अशी एकच गर्दी अमेरिकेतील डॉ़ल्बी थिएटरच्या रेड कार्पेटवर झाली आहे. या थिएटरपाशी असणाऱ्या परिसरात चाहत्यांचीही तोबा गर्दी झाली. ज्यामागोमाग मुख्य सोहळ्याचीही सुरुवात झाली. पाहता पाहता एक एक पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि अखेर सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराची घोषणा करत यंदाचा ऑस्कर सोहळा संपनान झाला. 

असे होते या सोहळ्यातील खास क्षण.... 

*बहुप्रतिक्षित असा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर यंदाच्या वर्षी 'पॅरासाईट' या चित्रपटाला देण्यात आला. पाहा तो खास क्षण.... 

 

* रेनी झेल्वेगरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मानाचा ऑस्कर प्रदान करण्यात आला. 

*'जोकर' या चित्रपटासाठी अभिनेता जोकिन फिनिक्स याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या ऑस्करने गौरवण्यात आलं. 

*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बाँग जून हो यांना 'पॅरासाईट' या चित्रपटासाठी ऑस्करने गौरवण्यात आलं. 

*'रॉकेटमॅन'मधील 'आय एम गॉन अ लव्ह मी अगेन' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीताचा ऑस्कर मिळाला. 

*'जोकर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. 

*'पॅरासाईट' चित्रपटाला आणखी एक ऑस्कर. आंतरराष्ट्रीय फिचर फिल्मसाठीच्या पुरस्काराने चित्रपटाचा गौरव. 

*सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा या विभागातील ऑस्कर 'बॉम्बशेल' या चित्रपटाच्या खात्यात गेला. 

*'१९१७'ची हॅटट्रीक; चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर. 

*सर्वोत्कृष्ट संकलनाचा ऑस्कर 'फोर्ड व्हर्सेस फेरारी'च्या खात्यात गेला. यासाठी मायकल मकक्लस्कर आणि अँड्य्रू बकलँड यांना गौरवण्यात आलं. 

*सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी यंदाचा ऑस्कर '१९१७' या चित्रपटाला देण्यात आला. रॉजर डेकिन्स यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा या चित्रपटाचा आतापर्यंतचा दुसरा ऑस्कर पुरस्कार ठरला. 

*'१९१७' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनीमिश्रणाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

*सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलनाचा यंदाचा ऑस्कर 'फोर्ड व्हर्सेस फेरारी' या चित्रपटाला देण्यात आला

*सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी यंदाच्या वर्षीच्या ऑस्करने लॉरा डेर्नचा गौरव करण्यात आला. 'मॅरेज स्टोरी' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. 

*सर्वोत्कृष्ट (शॉर्ट सब्जेक्ट) माहितीपटाचा पुरस्कार 'लर्निंग टू स्केटबोर्ड इन वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)'ला प्रदान करण्यात आला. 

*सर्वोत्कृष्ट (फिचर) माहितीपटाचा पुरस्कार मिळाला, 'अमेरिकन फॅक्ट्रीला'

*सर्वोत्कृष्ट वेशभूषा 'लिटील वूमन'

*सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन  डिझाईन Once upon a time in Hollywood 

*सर्वोत्कृष्ट 'लाईव्ह ऍक्शन' लघुपट या विभागातील ऑस्कर 'द नेबर्स विंडो'ला प्रदान करण्यात आला. 

*सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)

*सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा ऑस्कर 'पॅरासाईट' या चित्रपटाला मिळाला. हा दक्षिण कोरियासाठीचा पहिला ऑस्कर ठरला. 

*'हेअर लव्ह' ठरला सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट 

*'टॉय स्टोरी ४' ठरला सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट 

*यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारांची सुरुवात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या  पुरस्कारांनी करण्यात आली.  चित्रपटासाठी 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड'  Once upon a time in Hollywood  या चित्रपटासाठी अभिनेता ब्रॅड पीट याला हा पुरस्कार देण्यात आला. 

*'पॅरासाईट' या चित्रपटाच्या टीमने अनोख्या अंदाजात ऑस्करच्या रेड कार्पेटवर प्रवेश केला. 

*बिली आयलीश या सोहळ्या परफॉर्म करणार असल्यामुळे तिच्या सादरीकरणाकडेही साऱ्यांच्या नजरा असतील. 

Oscars2020 : ऑस्करच्या मानचिन्हाची किंमत अवघी ७० रुपये; पाहा कसं आहे हे गणित?