मुंबई : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आणि विनोदाचं कमाल टायमिंग असलेला अभिनेता कुशल बद्रिके. कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. कुशलची बायको त्याच्यापेक्षा टॅलेंटेड आहे. कुशलप्रमाणेच ती देखील कलाकार आहे. आज या अभिनेत्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि याचंच औचित्य साधून कुशलने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेअर केलेली पोस्ट अभिनेत्याने दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आहे.
कुशलने त्याच्या बायकोसोबत फोटो पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''मला चहा खूप आवडतो आणि मी तो पितो ही खूप. म्हणूनच कदाचित आपल्या लग्नाआधी काही नातेवाईक, माझ्याबद्दल ''तुला'' म्हणाले होते ''he is not your cup of tea'' तरीही चहाच्या टपरीवरच्या भेटीपासून, ते लग्नाच्या गाठी पर्यंतचा आपला प्रवास झालाच.
तू लक्ष्मीच्या पावलांनी, ''भाड्याच्या खोलीत'' आलीस आणि नटराजाच्या पावलांनी “स्वतःच्या घरात” नाचू लागलीस. आता आपल्या घरात चहापाण्याला आलेल्या नातेवाईकांसोबत तू बसतेस आणि बऱ्याचदा त्यांना coffee पाजतेस बहुतेक तुलाही पटलंय, I am not your cup of tea… I am your ''cappuccino'' बघ, संपल्यावरही रेंगाळून राहीन ''चवीसारखा'', तुझ्या आयुष्यात. एक गोड आठवण बनुन……. Happy marriage anniversary yaar सुकून ''
कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकजण या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत या पोस्टवर लिहीलं आहे की, चाय ने मेहनत की रंग लायी और मेहनत ने चाय पिने कि जग्ह बदल दि कपबशी ना हैप्पी Anniversary तर अजून एका कमेंट करत लिहीलंय की, 'सगळ्यांना हसवणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात खोल... समुद्र असतो.... वाह !! दादा ... फार सुंदर शब्दात व्यक्त झालात...'' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, 'किती छान लिहिलंय दादा जी माणसं आपल्या वाईट काळात आपल्या सोबत असतात त्यांच्या सोबत आपला success enjoy करायला मिळणं ही खुप मोठ्ठी गोष्ट. तुमचं प्रेम असच वाढो लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा दोघांना. तर अनेकजण या कपलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.