सट्टा प्रकरण: चित्रपट निर्माता पराग संघवीला ठाणे पोलिसांकडून समन्स

 दरम्यान सोनू जालानवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. ठाणे नगर पोलिसांत सोनूवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Updated: Jun 4, 2018, 12:22 PM IST
सट्टा प्रकरण: चित्रपट निर्माता पराग संघवीला ठाणे पोलिसांकडून समन्स title=

ठाणे: क्रिकेटवरच्या सट्ट्याप्रकरणी चित्रपट निर्माता पराग संघवीला ठाणे खंडणी पथकाकडून समन्स बजावलं जाणार आहे. तर एका माजी पोलीस अधिकाऱ्यालाही समन्स पाठवलं जाणार आहे. आता पराग संघवीच्या चौकशीतून सट्टा लावणाऱ्या आणखी सेलिब्रिटींची नावं बाहेर येणार का, याची उत्सुकता आहे.. दरम्यान सोनू जालानवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. ठाणे नगर पोलिसांत सोनूवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मसाले व्यवसायीका कडून रवी पुजारी कडून धमकी देवून ३  कोटींचा फ्लाट आपल्या नावी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

कोण आहे पराग संघवी

पराग संघवी हा चित्रपट निर्माता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. याद पार्टनर, सरकार यांसारख्या बहुचर्चीत चित्रपटांचाही समावेश आहे. पराग हा सोनूचा पार्टनर असल्याची माहिती आहे. त्यामुळे चौकशी साठी ठाणे खंडणी विरोधी पथका त्याला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे.

बॉलिवूडचं बेटींग कनेक्शन

आयपीएल बेटींगप्रकरणी अभिनेता दिग्दर्शक अरबाझ खानचं नाव समोर आल्यावर पुन्हा एकदा बेटींग आणि बॉलिवूडचं कनेक्शन समोर आलंय. कित्येक सेलिब्रिटी हे बेटींगच्या आहारी गेल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेष, म्हणजे पैशांसाठी नाही तर स्टेटस सिंबॉल म्हणून अनेक सेलिब्रिटी लाखो करोडोंचा सट्टा लावतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.