Manish Paul चा बालविवाह झालाय का? देखण्या लेकिला पाहून नेटकऱ्यांचे सैराट प्रश्न

गणेश विसर्जनाच्या वेळी मनीष पॉल सहकुटुंब सहपरिवार स्पॉट झाला.

Updated: Sep 5, 2022, 01:41 PM IST
Manish Paul चा बालविवाह झालाय का? देखण्या लेकिला पाहून नेटकऱ्यांचे सैराट प्रश्न title=

Manish Paul Daughter Photo: आपल्या अभिनयानं टेलिव्हिजन क्षेत्रात सर्वांचा लाडका ठरलेला अभिनेता मनीष पॉलनं (Manish Paul) कुटुंबियांसह गणेशोत्सव साजरा केला. मनीष आपल्या पत्नी व दोन मुलांसह गणपती बाप्पाचं विसर्जन करतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यावेळी मनीष, मनीषची पत्नी, मोठी मुलगी आणि लहान मुलगा यावेळी गणपती बाप्पाला निरोप दिसताना दिसले. 

तुम्हाला मनीष पॉलबद्दल अनेक गोष्टी माहित असतीलच पण तुम्ही त्याच्या लाडक्या मुलीला पाहिले आहेत का? गणेश विसर्जनाच्या वेळी मनीष पॉल सहकुटुंब सहपरिवार स्पॉट झाला तेव्हा त्याच्या मोठ्या मुलीवर सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या. 

नुकताच मनीष पॉलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मनीष पॉलची मोठी मुलगी सायशा पॉल दिसते आहे. सायशाला बघून लोक थक्क झाले कारण ती इतकी सुंदर दिसत होती की अनेकांनी तिला ओळखताही आले नाही. त्याचसोबत मनीष पॉलची मुलगी इतकी मोठी आहे यावरही कोणाचा विश्वास बसला नाही. 

मनीष पॉलची मुलगी लाईमलाईटपासून दूर आहे. मनीष स्वतःही सायशाचे जास्त फोटो शेअर करत नाही. त्यामुळे अचानक तिचा हा लुक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मनीष आपल्या मुलीपेक्षा आपल्या पत्नीचे संयुक्ताचेही फोटो शेअर करत असतो. मनीषची मुलगीही दिसायला खूप सुंदर आहे. 

मनीष पॉलने 2007 मध्ये त्याची शालेय मैत्रिण संयुक्तासोबत लग्न केले. त्याला दोन मुलं आहेत. मुलीचे नाव सायशा पॉल आणि मुलाचे नाव युवन पॉल आहे. सायशा पॉलचा जन्म 2011 मध्ये झाला. वयाच्या 11 व्या वर्षी ती खूपच सुंदर दिसत आहे.  

टिव्ही जगतात पॉप्यूलर होस्ट मनीष पॉल नेहमीच चाहत्यांच्या चर्चत असतो. आपल्या होस्टिंगमुळे तो घराघरात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याच्या कॉमिक टाईमिंगमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये तो खूप लोकप्रिय ठरला आहे. 

मनीष पॉलनेही अनेक चित्रपट केले आहेत तरी त्याला चित्रपट विश्वात जेवढे यश मिळाले नाही तेवढे यश त्याला होस्ट म्हणून मिळाले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकताच त्याचा मल्टिस्टार कास्ट जुग जुग जिओ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही परंतु इतर चित्रपटांच्या मानानं हा चित्रपट बॉक्स ऑफिस बऱ्यापैंकी कमाई करू शकला असे बोलले जाते. आता मनीष लवकरच 'झलक दिख ला जा' हा शो होस्ट करणार आहे.