मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर 'ससुराल सिमर का' या मालिकेतील सिमरच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. सोबतच दीपिका 'बिग बॉस 12' ची विजेती राहिली आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांची त्यांच्या लाईफ पार्टनरसोबत सेटवर भेट झाली आहे. तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडली आहेत. डेट केल्यानंतर काही काळात या कलाकारांनी विवाह करत आपल्या सुखी आयुष्यला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिकाने दोन विवाह केले.
दीपिकाचे पहिले लग्न तीन वर्षे टिकले, पण काही गोष्टींमुळे तिने आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती शोएब इब्राहिमसोबत 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. नंतर दोघांनी लग्न गाठ बांधली घेतल्या.
शोएब इब्राहिमसोबत प्रेम विवाह केल्यानंतर दीपिकाने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिला बरंच ट्रोलही करण्यात आले. दीपिका, मूळची पुण्याची, 2006 मध्ये नोकरीच्या निमित्ताने ती मुंबईत आली.
एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की तिला सुरुवातीला एअर हॉस्टेस बनण्याची इच्छा होती. दीपिका ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच सगळ्याचं लक्षवेधून घेते. 2010 मध्ये दीपिकाला टेलिव्हिजनवरील 'नीर भरे तेरे नैना देवी' मध्ये भूमिका मिळाली.
दीपिकाने 2009 मध्ये तिचा सह-अभिनेता रौनक सॅमसनसोबत पहिले लग्न केले.पण रौनकने लग्नाच्या तीन वर्षांनंतरही लग्नाची बातमी ही गुप्त ठेवली. हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.