अभिनयानंतर तेजस्विनी पंडित बनली बिझनेस वुमन; नव्या व्यवसायात पदार्पण

अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच तेजस्विनी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 

Updated: Jan 31, 2024, 06:34 PM IST
अभिनयानंतर  तेजस्विनी पंडित बनली बिझनेस वुमन; नव्या व्यवसायात पदार्पण title=

मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे की ती नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. सोशल मीडियावर तेजस्विनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तेजस्विनी नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असते. तिने एखादी पोस्ट करताच ती काही वेळातच व्हायरल होवू लागते. नेहमीच तेजस्विनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी तेजस्विनी चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. यावेळी तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. खरंतर तेजस्विनीने एका नवीन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

नुकतंच तेजस्विनी सलोन ओपन केलं आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करत तेजस्विनीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''आदरणीय श्री.राज ठाकरे साहेबांचे त्यांच्या मौल्यवान उपस्थितीबद्दल आणि संध्याकाळ समृद्ध केल्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद!! "AM to AM युनिसेक्स सलून, पुण्यातील पहिलं मिडनाईट सलून आहे, जिथे प्रत्येक ग्लो-अप हा  प्रेम आणि वनस्पती यांच्या आधारित जादूने तयार केला जातो. पुण्याच्या मध्यभागी वसलेले, आमचे सलून शहराच्या सर्व कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांसाठी आहे,क्विक टच-अप किंवा आनंददायी ब्युटी सेशनसाठी आजच सेशन बुक करा." ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, अरे वा.. अभिनंदन तेजू. तर अभिनेता सिद्धार्थ जाधवने म्हटलंय, Congratulations तेजस्विनी  poonam and team तर अजून एकाने म्हटलंय, पण तुम्ही नोटीस केलत का AM TO AM हे नव मराठी नाहीये. तर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अनेक सेलिब्रिटीदेखील तिच्या या पोस्टवर तिला शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. तिच्या नव्या बिझनेसाठी तिला तिचे चाहते शुभेच्छा देत आहेत. सलूनचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. तसंच सिद्धार्थ जाधवनं देखील या सलूनच्या उद्घाटनाला हजेरी लावली.