मुंबई : 'बिग बॉस 15' विजेती आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तेजस्वी प्रोफेशनल आयुष्याबाबत तर कायम चर्चेत असते, पण तिच्या खासगी जीवनाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर जोर धरतात. तेजस्वीचा प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतो. आता देखील तेजस्वीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तेजस्वी बॉयफ्रेंड आणि अभिनेता करण कुंद्राची माफी मागताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तेजस्वी करणच्या गाडीचा दरवाजा उघडते, तेव्हा कारचा दरवाजा एका झाडाला आदळतो....
चुकी झाल्यानंतर तेजस्वी करणची माफी मागते. सर्वांसमोर तेजस्वीने मागितल्यानंतर 'कारला काहीही झालेलं नाही...' असं करण तिला म्हणताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओतून दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम दिसून येत आहे.
सांगायचं झालं तर, तेजस्वी आणि करण कायम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांच्या नात्याला वेळ देतात. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं.