मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता अजय देवगनला तौत्के (Tauktae) चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. तौत्के चक्रीवादळने सगळ्याचं होत्याचं नव्हतं केलं आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची मोठी भरपाई अजयला करावी लागणार आहे. अजयने पाहिलेली स्वप्न या वादळात वाहून गेली आहेत.
अजयच्या 'मैदान' सिनेमाच्या सेटचं मोठं नुकसान झालं आहे. सेटचं खूप मोठं नुकसान झालं आहे. मात्र सेटवर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण सेटची अवस्था अशी आहे की, आता पुन्हा सेटवर शुटिंग करण्याची अवस्था राहिलेली नाही. या सेटवर अजय देवगनचं शूट होणार होतं.
मुंबईत या सिनेमाचा सेट उभारलं आहे. जेव्हा तौत्के चक्रीवादळ झालं तेव्हा सेटवर तब्बल 40 लोकं उपस्थित होते. त्या सगळ्यांनी सेट वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र 16 एकरवर पसरलेल्या या सेटला कुणीच वाचवू शकलं नाही. दिग्दर्शक अमित शर्मा या सिनेमाच्या शुटिंगकरता कोलकाता आणि लखनऊमध्ये गेले आहेत. या सेटवर फुटबॉल मॅचचं शुटिंग होणार होतं. या सिनेमाला पहिल्यापेक्षा खूपच उशिर झाला आहे. अशा परिस्थितीत चक्रीवादळामुळे सेटचं नुकसान झालं त्यामुळे सिनेमाला आणखी उशिर होणार आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या घराचं खूप नुकसान झालं आहे. या तौत्के चक्रीवादळामुळे सलमान खानच्या टायगर 3 या सिनेमाच्या सेटचं देखील नुकसान झालं आहे. आलिया भट्टचा सिनेमा गंगुबाई काठियावाडी सिनेमाचा सेट मात्र यामध्ये बचावला आहे. संजय लीला भन्साळी यांनी पहिलंच सेटला कव्हर केलं होतं.
अमित शर्मा यांचा मैदान हा सिनेमा भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीमचे कोच सैयद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल रहीम यांना भारतीय फुटबॉलचे वास्तुकार मानलं जातं. बोनी कपूर आणि झी स्टुडिओ मिळून हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे.