टप्पू के पापाsss म्हणणारी दया एकेकाळी होती 'इतकी' बोल्ड

दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Jan 21, 2022, 02:31 PM IST
टप्पू के पापाsss म्हणणारी दया एकेकाळी होती 'इतकी' बोल्ड title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील सर्वात लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मा आज प्रत्येक घरात पोहोचला आहे. मात्र, बऱ्याच दिवसांपासून या शोमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे.

दयाबेन ही शोमधील सर्वात आवडती व्यक्तिरेखा अद्याप शोमध्ये परत आलेली नाही पण तरीही लोकांच्या हृदयावर ती राज्य करते आहे. दिशा वकानी विवाहित असून तिला एक मुलगी असल्याने ती शोमध्ये दिसणार नाही.

निर्मात्यांनी अनेक वेळा तिला परत आणण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही करत आहेत. दरम्यान, दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. दिशाचा जन्म गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला, पण ती भावनगरमध्ये वाढली. ती शाळेत असल्यापासूनच अभिनयात गुंतलेली आहे.

अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून तिने ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली. तारक मेहता का उल्टा चष्माची दया बेन तिच्या अभिनयामुळे खूप प्रसिद्ध झाली आहे.

तिने अनेक गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. दया बेनला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

तिने अनेक मालिकांमध्ये फुकटातही काम केले. दयाबेन या नावाने प्रसिद्ध असलेल्या दिशाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कोणत्याही टीव्ही शोमधून नाही तर चित्रपटांमधून केली होती हे फार लोकांना माहीत नाही. ती पहिल्यांदा 1997 मध्ये आलेल्या 'कॉमसिन: द अनटचेबल्स' या बी-ग्रेड चित्रपटात दिसली होती.