तापसीच्या 'वोमनिया' सिनेमाची शूटिंग सुरू

अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमा 'वोमनिया' ची शूटिंग पून्हा सुरु करण्यात आली. काही कारणांमुळे सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आहे होते.

Updated: Feb 9, 2019, 06:47 PM IST
तापसीच्या 'वोमनिया' सिनेमाची शूटिंग सुरू  title=

मुंबई: अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमा 'वोमनिया' ची शूटिंग पून्हा सुरु करण्यात आली. काही कारणांमुळे सिनेमाचे शूटिंग थांबविण्यात आहे होते. सिनेमात पिंक फेम अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाचे शूटिंग पून्हा सुरु झाल्यामुळे तापसी फार खूश आहे. तिने तिची ही खुशाली सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना कळवली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तिने,'कधी माझ्या सिनेमाची शूटिंग बंद करतात तर कधी सिनेमाच्या नावासाठी वाद चालू असतात, आता माला असं आटतं की मीच सिनेमाची घोषणा करायला हवी आता ज्याला जे करायचे आहे ते करा, देशातील ओलडेस्ट आणि कूलेस्ट शूटर्सवर आधरित सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे.' लिहले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Old is Gold and this is certainly GOLD! Excited to begin the shooting of this groundbreaking real story of world's oldest sharpshooters! @taapsee @tusharhiranandani @anuragkashyap10 @reliance.entertainment @nidhiparmarhira

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar) on

 

सिनेमाचा बहुतेक भाग एका गावात शूट होणार असल्याचे म्हटले जात आहे. जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या सिनेमाची कथा आधारीत असून या महिलेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे. तर सिनेमात तापसी बरोबर अभिनेत्री भूमि पेडणेकर दिसणार आहे.

 

नुकतेच 'मिशन मंगल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'मिशन मंगल' सिनेमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तापसीने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.' एका सुंदर अशा प्रवासाचा शेवट झाला. कृतिका अग्रवालसाठी तयार करण्यात आलेल्या सिनेमाची शूटिंग संपली, एकाच फ्रेममध्ये एकापेक्षाएक कलाकारांचे असणे ही फार कमालीची बाब आहे.'