'क्या हालत बना रखी है', Intimate Scenes देणाऱ्या अभिनेत्रीची वाईट अवस्था

 पहिल्याच सिनेमात इंटिमेट सीन दिल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री आता दिसते अशी...   

Updated: Aug 30, 2022, 11:36 AM IST
'क्या हालत बना रखी है', Intimate Scenes देणाऱ्या अभिनेत्रीची वाईट अवस्था title=

मुंबई : बराच काळ, जवळपास दहा वर्षे हिंदी कलाविश्वापासून (Film Industry) दूर राहिलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने तिच्यासोबत घडलेल्या एका वाईट प्रसंगाचा खुलासा केला होता. अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांच्यावर तिने गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप लावले होते.  कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांवर वाचा फोडण्यासाठी तनुश्रीने अनेक महिलांना प्रेरणा दिली. आधी इंटिनेट सीन त्यानंतर मीटू मोहिमेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली तनुश्री पुन्हा चर्चेत आली आहे. 2004 मध्ये तनुश्रीने फेमिना मिस इंडियाचा खिताब जिंकला आणि त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

तनुश्रीने तिच्या पहिल्याच सिनेमात खूप बोल्ड सीन्स दिले, ज्यामुळे अभिनेत्री एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली. तनुश्रीने 2005 मध्ये 'आशिक बनाया आपने' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) होता.

सध्या झगमगत्या विश्वापासून दूर असलेली तनुश्रीला नुकताच एक कर्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. जेव्हा अभिनेत्रीला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं. तनुश्रीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीला अनेकांनी ट्रोल केलं. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता की इन तस्वीरों को लोग ट्रोल कर रहे हैं

कार्यक्रमादरम्यानचे तनुश्रीचे फोटो व्हायरल होताचं नेटकऱ्यांनी (social media) अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. काही युजर्स अभिनेत्रीच्या फोटोंवर 'क्या हालत बना रखी है' अशी कमेंट केली आहे, तर काहीनी तिला 'गोल मटोल' म्हणून ट्रोल केलं आहे. 

                                                                                                                                                                                         039                                                       039    039                         039

 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेला एक प्रसंग तनुश्रीने एका मुलाखतीत उघड केला आणि संपूर्ण कलाविश्वात एकच खळबळ माजली. ज्यानंतर अनेकांनीच तनुश्रीला पाठिंबा दिला. ज्यामध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, सोनम कपूर यांच्या नावाचा समावेश आहे.