'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Sep 23, 2022, 12:36 PM IST
'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे title=

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तनुश्री 2020 मधील #MeToo प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. तनुश्रीनं अभिनेता नाना पाटेकर  (Nana Patekar) यांच्यावर #MeToo प्रकरणात गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे चित्रपटसृष्टीत एक वेगळाच वाद सुरु झाला होता. खरंतर भारतात MeToo या प्रकरणाची सुरुवात तनुश्रीनं केलेल्या आरोपांपासून सुरु झाली होती. तनुश्रीनं आता या प्रकरणासंबंधीतच एक नवा आरोप केला आहे. (Tanushree Dutta After Me Too Claims) 

आणखी वाचा : 'गौरी तुला कधी...', पत्नी विषयी विचारलेल्या 'त्या' खासगी प्रश्नावर Shahrukh Khan म्हणाला...

तनुश्रीनं नुकतीच कनेक्ट एफएम कॅनडाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तनुश्री म्हणाली, टतिच्या पाण्यात काहीतरी मिसळून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उज्जैनमध्ये असताना तिच्या कारचं अनेकदा नुकसान करण्यात आलं. तिच्या गाडीच्या ब्रेकशी छेडछाड करण्यात आली. त्याच वेळी तिचा भीषण कार अपघातसुद्धा झाला होता. अपघातानंतर बरं होण्यासाठी तिला बराच वेळ लागलाट, असं तनुश्री म्हणाली. 

आणखी वाचा : आमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

पुढे तनुश्री म्हणाली, 'माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, माझ्या पाण्यातही विष मिसळलं जात असल्याचं मला समजलं होतं. यासाठी माझ्या घरी प्लॅनिंग करुन एक घरकाम करणारी बाई पाठवण्यात आली होती. त्यानंतर मी आजारी पडू लागले होते. तेव्हा माझ्या पाण्यात विष मिसळलं जात असल्याची मला खात्री पटली.'(Tanushree Dutta claims multiple attempts made on her life brakes of my car were tampered and something mixed in my water)

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

तनुश्री पुढे म्हणाली, 'जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं होतं. बॉलिवूड माफिया आणि आपल्या देशातील जुने आरोपी अशा कारवाया चालवतात आणि लोकांना त्रास दिला जातो. या सगळ्यामागे तेच लोक आहेत ज्यांची नावं मी MeToo मोहिमेअंतर्गत उघडपणे सांगितली होती.'

आणखी वाचा : Paparazzi नं राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारताच Taapsee Pannu संतापली, म्हणाली '...बाजूला व्हा'

2 वर्षांपूर्वी तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केले होते. यानंतर ती बराच काळ वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मात्र प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनीही हस्तक्षेप करत प्रकरणाचा तपास केला. काही काळानंतर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. तिथेचा हा वाद बराच काळ चर्चेत होता. तनुश्रीनं MeToo प्रकरणात पुढे येऊन तिचे अनुभव सांगितल्यानंतर अनेक महिलांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले.