मुंबई : साऊथ इंडियन सिनेमाचे दिग्दर्शक थामिर यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंजत होते. मंगळवारी चेन्नईतील अशोक पिलर जवळ असलेल्या माया हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. थामिराने के. बालाचंदर आणि भारती राजा सारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. त्याने 'Aan Devadhai'आणि 'Rettai Suzhi'सारख्या तमिळ सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
थामिरा यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. तेथील ट्रेड ऍनालिस्ट कुनिश्क एलएम यांनी लिहिलं आहे की,'दिग्दर्शक थामिरा (Aan Devadhai, Rettai Suzhi फेम) कोरोनाशी लढताना त्यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालावली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. '
Director #Thamira (Aan Devathai, Rettai Suzhi fame) has unfortunately lost his battle to Covid. He passed away today mrng. May his soul RIP
Heartfelt condolences to his family and friends! @johnmediamanagr
— Kaushik LM ( #StaySafe) (@LMKMovieManiac) April 27, 2021
We have lost another true gem. #Thamira Sir remained true to his craft and never chased fame or money. Working with him was a great gift. May his soul RIP. Heartfelt condolences to Sir's family. pic.twitter.com/D0llFY8RWM
— Ghibran (@GhibranOfficial) April 27, 2021
संगीत दिग्दर्शक एम घिबरण यांनी म्हटलं आहे की,'आपण आणखी एक खरा रत्न हरपला. थामिर सर आपल्या कामासाठी अतिशय खरे होते. कधी त्यांनी प्रसिद्धी किंवा पैशाचा विचार केला नाही.'
अभिनेत्री राम्या पांडियन यांनी लिहिले आहे, "मी नेहमी थमीरा सरांच्या पटकथेची प्रशंसा केली आहे. तमिळ बद्दल त्यांचं असलेलं प्रेम हे विलक्षण होतं.