'या' अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, लग्नाच्या एक दिवस आधी एक्स बॉयफ्रेंडसोबतचे इंटिमेट फोटो लीक

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नयनतारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Updated: Jun 8, 2022, 01:04 PM IST
'या' अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, लग्नाच्या एक दिवस आधी एक्स बॉयफ्रेंडसोबतचे इंटिमेट फोटो लीक title=

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नयनतारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत ९ जून रोजी लग्न करणार आहे. मात्र लग्नाच्या एक दिवस आधी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक्स बॉयफ्रेंडसोबतचे इंटिमेट फोटो असल्याचं बोललं जात आहे.

नयनताराचे नाव याआधी तामिळ चित्रपटसृष्टीतील दोन सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते. त्यापैकी एक होते सिंबू. अभिनेत्रीने सिंबूशी लग्न करण्याचा विचारही केला होता, पण नंतर तिचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या फोटोंमुळे त्यांचे नाते तुटले. आता अभिनेत्री दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न करत असताना पुन्हा एकदा इंटिमेट फोटो व्हायरल होत आहेत.

2014 मध्ये सिंबू आणि नयनताराचे काही खासगी फोटो व्हायरल झाले होते. नयनतारा आणि सिंबू यांच्या इंटिमेट फोटोमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हे फोटो पाहून अभिनेत्री नयनतारा हिलाही मानसिक त्रास सहन करावा लागला होता. या फोटोमुळे नयनतारा यांतं मानसिक खच्चीकरण झालं. तसेच दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि नातं तुटलं.  

नयनतारा हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असून निर्माते विघ्नेश शिवन सोबत लग्न करणार आहे. सहा वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नयनताराचे चाहते या निर्णयामुळे खूप खूश आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत.