'शरीरावरून बोलणं म्हणजे लज्जास्पद...' वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सई लोकूर

नुकतीच सईने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली यामध्ये तिने ट्रोलर्स कानउघडणी केल्याचं दिसत आहे. 

Updated: Feb 27, 2024, 08:07 PM IST
'शरीरावरून बोलणं म्हणजे लज्जास्पद...' वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सई लोकूर  title=

मुंबई : अभिनेत्री सई लोकूर नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.  १७ डिसेंबरला सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सईने ही आनंदाची बातमी दिली होती. अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव 'ताशी' असं ठेवलं आहे. लग्नानंतर सईने सिनेसृष्टीतून गायब झाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच सईने अभिनेत्री मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतची भेट घेतली. ज्याचे फोटो सईने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.  

सईने नुकतेच  मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी सईचं वाढतं वजन पाहून अभिनेत्री चांगलीच ट्रोल झाली आहे. आई झाल्यानंतर सईच वजन वाढल्याने सई खूप ट्रोल झाली आहे. शारीरिक बदलावरून अनेकांनी तिला ट्रोलही केले होते. अनेकांनी सईला वजनावरून टोमणे मारले होते. मात्र वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांवर सई चांगलीच संतापली आहे आणि तिने ट्रोलर्सला चागंलच सुनावलं आहे.
 
नुकतीच सईने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली यामध्ये तिने ट्रोलर्स कानउघडणी केल्याचं दिसत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सईने लिहीलं आहे की, ''ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे, त्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही. त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरं होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या. सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे, जिथे तुमच्या शरीराचे सहा थर कापले जातात.

 

या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात. तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, काहीही जड उचलू शकत नाही, वाकू शकत नाही, तुमच्या स्तनपानामुळे तुम्ही आहारही घेऊ शकत नाही.  एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यथांमधून जात असते आणि या काळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे. या प्रतिक्रियांनी मला आश्चर्य वाटले, पण देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, कारण मला तुमची खूप दया येते. जर लोक थोडे आणखी समजूतदार, आदराने, दयाळू राहिले तर हे जग त्यांना राहण्यासाठी एक चांगले ठिकाण असेल.''