Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता तारक मेहता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. 

Updated: Feb 22, 2023, 02:49 PM IST
Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट  title=

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गेली 15 वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकारांनी या शोला रामराम केला आहे. जुन्या कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली. आता या मालिकेतील तारक मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. मालिकेत नव्या ‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ वयाच्या 50 व्या वर्षी तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sacchin shrof (@sachinshroff1)

मिळालेल्या माहितीनुसार नवीन तारक मेहता म्हणजे खऱ्या आयुष्यातील सचिन श्रॉफ हा 25 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईमध्ये त्याचा लग्नसोहळा पार पडणार असून काही मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामध्ये कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्र परिवाराचा समावेश आहे. 

वाचा : 'तुझी तुलाच पुरी करायची....', ओंकार भोजनेचा 'तो' Video Viral

सचिन श्रॉफच्या होणाऱ्या पत्नीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र तो बहिणीच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार असल्याचं कळतंय. हे अरेंज मॅरेज असून सचिनची होणारी पत्नी ग्लॅमर विश्वातील नाही. ती इव्हेंट ऑर्गनायझर आणि इंटेरिअर डिझायनर असल्याचं समजतंय.

सचिन श्रॉफ हा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार असून 2009 मध्ये  टेलिव्हिजन अभिनेत्री जुही परमारशी पहिलं लग्न केलं होत. जवळपास नऊ वर्षे त्यांचा संसार सुरु होता. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना 10 वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव समायरा आहे. जानेवारी 2018 मध्ये जुहीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जुलै 2018 मध्ये दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. घटस्फोटानंतर समायराचं पालकत्व जुहीला देण्यात आलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याच्या 5 वर्षांनंतर आता सचिन आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.