'जेठालालने घरात साप पाळला होता', 'बबिता' आणि 'टप्पू'च्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

मुनमुन आणि राज यांनी गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचे बोललं जात आहे. राज आणि मुनमुन यांच्यात जवळपास 9 वर्षांचे अंतर आहे. 

Updated: Mar 13, 2024, 06:36 PM IST
'जेठालालने घरात साप पाळला होता', 'बबिता' आणि 'टप्पू'च्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर title=

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता याच मालिकेतील टप्पू हे पात्र साकारणारा अभिनेता राज अनाडकटने बबिता फेम अभिनेत्री मुनमुन दत्तासोबत साखरपुडा केल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या साखरपुड्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर मीम्सचा पूर आल्याचे दिसत आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता हे पात्र सतत चर्चेत असते. बबिता हे पात्र अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारताना दिसते. काही महिन्यांपूर्वी बबिता आणि टप्पू हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर त्यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केली होती. पण आता मुनमुन आणि राज यांनी गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचे बोललं जात आहे. राज आणि मुनमुन यांच्यात जवळपास 9 वर्षांचे अंतर आहे. राज आणि मुनमुन यांच्या साखरपुड्यानंतर आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. यातील बहुतांश मीम्स हे जेठालाल, दया भाभी आणि इतर मालिकेतील कलाकारांचे असल्याचे दिसत आहे. 

पाहा काही हटके मीम्स : 

दरम्यान मुनमुन दत्ताचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या ठिकाणी झाला होता. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत 2008 पासून ती बबिता हे पात्र साकारत आहे.  तिची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. तर राजचा जन्म 7 नोव्हेंबर 1996 रोजी झाला. तो सध्या 27 वर्षांचा आहे. राजने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत 2017 मध्ये पदार्पण केले. यात त्याने टप्पू हे पात्र साकारले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्याने या कार्यक्रमाला रामराम केला होता.