Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : २५ दिवसांच्या शुटिंगचे ३६ लाख आकारतात जेठालाल

का आकारतात एवढे रुपये 

Updated: Jun 26, 2020, 06:12 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : २५ दिवसांच्या शुटिंगचे ३६ लाख आकारतात जेठालाल  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गोकुळधाम सोसायटीतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. ही मालिका प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी खास आहे. या मालिकेतील जेठालाल आणि बबीता अय्यर यांची मैत्री खूप लोकप्रिय आहे. जेठालाल यांच कॅरेक्टर लोकं मनापासून पसंत करतात. 

जेठालाल हे कॅरेक्टर अभिनेता दिलीप जोशी साकारत आहे. दिलीप जोशी यांना अभिनयाची प्रचंड आवड असून २५ दिवसांकरता ते जवळपास ३६ लाख रुपये आकारतात. जाणून घेऊया दिलीप जोशी यांच्या खासगी जीवनाबद्दल 

दिलीप जोशी कारचे चाहते :

त्यांना कारची प्रचंड आवड आहे. गाड्यांच त्यांच्याकडे उत्तम कलेक्शन आहे. त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत Audi Q-7 ही गाडी जवळपास ८० लाखाच्या घरात आहे. Innova ज्याची किंमत १४ लाख आहे. 

२५ दिवसाच्या शूटचे आकारतात एवढे रुपये : 

दिलीप जोशी एका एपिसोडचे जवळपास १.५० लाख रुपये आखारतात. तसेच दिलीप जोशी एका महिन्यात फक्त २५ दिवस काम करतात. इतर दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत काम करतात. २५ दिवसांच्या शुटिंगचे दिलीप जोशी ३६ लाख रुपये आकारतात. 

एक अशी वेळ होती जेव्हा काम मिळत नव्हत : 

मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांनी इंडस्ट्री मालिकांसोबतच सिनेमांत देखील काम केलं आहे. पण एक वेळ अशी आली होती की, त्यांच्याकडे काही कामच नव्हतं. तारक मेहताचा शो साईन करण्याअगोदर एक वर्षभर त्यांच्याकडे कामच नव्हतं. मात्र या शोला साईन करून त्यांच नशीबच बदलून गेलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 

दिलीप जोशी यांच्या पत्नीचं नाव : 

तारक मेहता शोमध्ये जेठालाल यांचा स्वभाव खूप हसमुख आहे. यामुळे ते प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यांनी अभिनय, कॉमेडी आणि डायलॉग डिलीवरी ही उत्तम आहे. 'तारक मेहता' मध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका 'दयाबेन' साकारत आहे. मात्र खऱ्या आयुष्यात 'जयमाला' या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असा सुखी संसार आहे.