बेडरुम फोटो शेअर केल्यामुळे ‘Taarak Mehta...’ फेम रिटा रिपोर्टर ट्रोल

'तारक मेहता का उल्टा चष्मा'  मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातली एक व्यक्तीरेखा म्हणजे मालिकेत रिपोर्टरची भूमिका साकारणारी रिटा म्हणजे अभिनेत्री प्रिया आहूजा सध्या बेडरुम फोटोंमुळे चर्चेत आहे.   

Updated: Dec 4, 2022, 12:39 PM IST
बेडरुम फोटो शेअर केल्यामुळे ‘Taarak Mehta...’ फेम रिटा रिपोर्टर ट्रोल   title=

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Rita Reporter :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील रिटा रिपोर्टर म्हणजेच प्रिया अहुजा (Priya Ahuja) सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. तिचे फोटो इंस्टाग्रामवर खूपच व्हायरल होत असतात. ती अनेकदा बोल्ड अंदाजात फोटोशूट करताना दिसते. नुकताच अभिनेत्रीने स्वतःचे बेडरुममधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. ज्यामुळे अभिनेत्री ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

प्रियाने तिच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्या ट्रोलर्सना सडतोड उत्तर दिलं आहे. इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत प्रियाने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 'माझ्या फोटोवर मला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्ससाठी... तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं, तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता या गोष्टीचा मला काही फरक पडत नाही...'

'कमेंटमध्ये अनेकांनी मालवचं (प्रियाचा पती) देखील नाव घेतलं. तो मला असे कपडे घालण्यासाठी कशी परवानगी देतो? एवढंच नाहीतर, अरदास (प्रियाचा मुलगा) चं देखील नावमध्ये घेतलं. एक आई म्हणून मी त्याला काय शिकवणार. या गोष्टी मालव आणि अरदास यांना ठरवू द्या...'

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मी आयुष्य कसं जगेल, कसे कपडे घालेल... हा माझा प्रश्न आहे. त्यासाठी मला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही.' असं देखील अभिनेत्री म्हणाली. शिवाय मला तुमच्या सल्ल्याची देखील गरज नाही असं म्हणत प्रियाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. 

दरम्यान, छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका  'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)'सर्वांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना मालिका फार जवळची आहे. मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातली एक व्यक्तीरेखा म्हणजे मालिकेत रिपोर्टरची भूमिका साकारणारी रिटा म्हणजे अभिनेत्री प्रिया आहूजा सध्या बेडरुम फोटोंमुळे चर्चेत आहे.