TMKOC मालिकेतून अजून एक अभिनेत्री बाहेर, म्हणाली, ''माझं नातं संपलंय...''

Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून दशकभराहून जास्त वेळ सुरू असलेली ही मालिका आता अनेक कलाकार सोडून जाताना दिसत आहेत. त्यात आता अशाच एका अभिनेत्रीनं बाय बाय केलं आहे. 

Updated: Jul 19, 2023, 07:11 PM IST
TMKOC मालिकेतून अजून एक अभिनेत्री बाहेर, म्हणाली, ''माझं नातं संपलंय...'' title=
July 19, 2023 | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actress priya ahuja quits the show (Photo: Zee News)

Tarak Mehta Ka Ooltah Chashma: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेची. या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. याचं कारण हे की या मालिकेतील अनेक कलावंत हे मालिका सोडून गेलेले आहेत. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीनं मालिका सोडल्यानं सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या लोकप्रिय अभिनेत्री मालिका सोडल्यामुळे आता मालिका पाहायची तरी कुणासाठी कारण सर्वचजण मालिका सोडून जात असल्यानं आता प्रेक्षकांसमोरही वेगळाच प्रश्न पडला आहे. आता या मालिकेतून एक लोकप्रिय अभिनेत्रीनं एक्झिट घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आता लवकरच या मालिकेतून तिच्या जागी कोणी नवी अभिनेत्री येणार का याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. नक्की ही अभिनेत्री आहे तरी कोण? 

या अभिनेत्रीचं नावं आहे प्रिया अहुजा. या मालिकेतून ती रिपोर्टची भुमिका करत होती. तिनं एका मुलाखतीत याची घोषणा केली आहे. तिनं झुमला दिलेल्या एका व्हिडीओमध्ये याबाबत सांगितले आहे. ''ती म्हणाली की, निर्मात्यांच्या बाजूनं काहीही स्पष्ट नाही त्यातून मला कोणतेही उत्तरही त्यांच्याकडून आले नाही. मी त्यांना शेवटचा मेसेज पाठवला होता परंतु त्यानंतर मला काहीच विचारले गेले नाही. अगदी माध्यमांमध्येही नाही. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आता मला वाटते की मी त्या शोचा भाग नाही. त्यातून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत उत्तरही मला आले नाही. मी मला सांगावेसे वाटते की मी तारक मेहता का उल्टा चष्माचा भाग नाही.'' असं ती म्हणाली. तेव्हा आता ती या मालिकेचा भाग नाहीये. 

हेही वाचा - मराठी मालिकेतल्या संस्कारी सूनेचा बोल्ड अंदाज... स्विमसूटमध्ये शेअर केला Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती आता एका नव्या गाण्यातून दिसणार आहे. यावेळी ती अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीसोबत एका म्युझिक व्हिडीओमधून दिसणार आहे. यावेळी त्यांनी पारस छाब्रासोबत कोलॅबोरेट केले आहे. त्या दोघी यावेळी सुंदर बंगाली साडीत दिसत आहे. यापुर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून अनेक कलाकार सोडून गेले आहेत. त्यामुळे या मालिकेतील वादही वाढू लागले आहेत. मध्यंतरी या मालिकेतील अभिनेत्रीनं निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले होते. या मालिकेतील कलाकारांच्यात आणि निर्मात्यांमध्येही वाद आहेत. सध्या त्यामुळेच ही मालिका प्रचंड चर्चेत आहे.