Taarak Mehta ka Ooltah Chashmah: दयाबेनचा बोल्ड अवतार पाहिला का? बिकिनी घालून डान्स

दयाबेनचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही आश्चर्यच वाटेल. 

Updated: Aug 28, 2022, 04:29 PM IST
Taarak Mehta ka Ooltah Chashmah: दयाबेनचा बोल्ड अवतार पाहिला का? बिकिनी घालून डान्स title=

मुंबई : दयाबेन म्हटलं की, सर्वांच्या चेहऱ्यावर लगेचच हास्य येतं. कारण गेल्या 14 वर्षांपासून ती लोकांचं मनोरंजन करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमधून तिने लोकांचे हृदयात स्थान मिळवलं आहे. टीआरपीच्या यादीतही हा शो नेहमीच वर असतो. जेठालालची पत्नी दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी आजही लोकांची आवडती आहे. शोमध्ये दिशा नेहमीच साडी, बिंदी आणि बांगड्यांमध्ये दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की दिशाने या शोपूर्वी अनेक बोल्ड कॅरेक्टर्स देखील साकारल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याचा असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत.

दयाबेनचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही आश्चर्यच वाटेल. तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ एका चित्रपटातील गाण्याचा आहे, ज्यामध्ये दिशा वकानीने शॉर्ट स्कर्टसह बिकिनी टॉप घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती ग्लॅमरस स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

दयाबेनलाही या शोमध्ये पसंती दिली जाते कारण जेव्हाही ती खूश असते तेव्हा ती लगेच गरबा डान्स सुरू करते. पण या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की दयाबेन कॅबरे डान्ससारख्या बोल्ड स्टेप्स करत आहेत. या व्हिडिओमध्ये तिची बोल्ड ड्रेसमधील परफेक्ट फिगरही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.