17 वर्षांची बबीता कशी दिसायची माहितीये? मुनमुनचे फोटो पाहून चाहत्यांनी केली लाना डेलशी तुलना

Munmun Dutta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबीता 17 वर्षांची असताना कशी दिसायची माहितीये? 

दिक्षा पाटील | Updated: Sep 2, 2024, 07:17 PM IST
17 वर्षांची बबीता कशी दिसायची माहितीये? मुनमुनचे फोटो पाहून चाहत्यांनी केली लाना डेलशी तुलना title=
(Photo Credit : Social Media)

Munmun Dutta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये बबीता अय्यरची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. मुनमुन दत्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. मुनमुन दत्तानं तिच्या पहिलाय जाहिरातीच्या शूटमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिची जर्नी तिनं यातून दाखवली आहे आणि तिला पाहून चाहत्यांना देखील आश्चर्य झाले आहे. तर तिच्या सगळ्या अनुभवांना आणि आठवणींना तिनं चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

मुनमुननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मुनमुन काही जुने फोटो शेअर केले आहेत. मुनमुननं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर ती एका पिवळ्या रंगाच्या गाडीसमोर उभी आहे. हे फोटो केरळच्या बॅकवॉटर येथील आहेत. त्यावेळी मुनमुन ही 17 वर्षांची होती. तर हे फोटो शेअर करत कॅप्शन सांगितलं की आर्काइव्ह्समधील एक झलक... केरळाच्या बॅकवॉटर्समध्ये 17 वर्षांचे मी माझी पहिली जाहिरात ती देखील स्कोडा कारची. ही संधी मिळाली तेव्हा मी किती उत्साही होते. त्याचं कारण म्हणजे एका न्यू कमरला इंडस्ट्रीमध्ये आणि त्यातही मुंबईसारख्या शहरात काम मिळालं ही मोठी गोष्ट होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे मुनमुन म्हणाली, 'त्यासोबत चांगली गोष्ट म्हणजे मला विमानातून कोणत्या दुसऱ्या सुंदर अशा ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. कारण विमानानं जाण्याची ही माझी दुसरीच संधी होती आणि मी खूप उत्सुक होते. हिच एकमेव संधी होती ज्यामुळे मी विमानातून प्रवास करू शकत होते. कारण माझ्याकडे तिकिट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते.'

पुढे मुनमुन म्हणाली,'त्यावेळी माझ्या आयुष्यात जिथे मला पैशा-पैशासाठी कष्ट करावे लागत होते, त्यावेळी विमानातून फिरणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला सगळ्या गोष्टी या सहज मिळालेल्या नाही, संघर्ष हे न संपणारे होते आणि मी त्या सगळ्यासाठी खूप आभारी आहे कारण त्यामुळेच मी इथे पोहोचू शकले. स्वत: लाच शाबासकी देते आणि देवाची आभारी आहे.'

 हेही वाचा : अखेर! Deepika नं दाखवलं बेबी बंप, फेक प्रेग्नंसी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

मुनमुननं शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी म्हटलं की तू अजूनही इतकीच तरुन दिसतेस. दुसरा नेटकरी म्हणाला, 17 वर्षांची लाना डेल रे?अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.