अमेरिकेतून परतलेल्या जेठालालवरसोबत घडला धक्कादायक प्रकार; अज्ञात व्यक्तीने केला हल्ला!

 हल्लेखोरांनी जेठालालची बॅग हिसकावून घेतली आणि पळून गेले.

Updated: Sep 30, 2022, 05:07 PM IST
अमेरिकेतून परतलेल्या जेठालालवरसोबत घडला धक्कादायक प्रकार;  अज्ञात व्यक्तीने केला हल्ला! title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बेस्ट डीलर बनल्यानंतर जेठालालला अमेरिकेला पाठवण्यात आलं. त्यामुळे काही काळ तो गोकुळधाम सोसायटीत दिसत नव्हता पण लवकरच तो परतणार आहे आणि परत येताच त्याच्यासोबत एक असा अपघात घडणार आहे. ज्याचा कोणी विचारही केला नसेल. तसं, जेठालाल अतिशय मनमिळाऊ असून त्याचं कोणाशीही वैर नाही, मग कोण आहे जो गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकाचा पाठलाग करत आहे.

अमेरिकेतून परतताच जेठालालवर हल्ला 
शोचा ताजा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये जेठालाल अमेरिकेतून परतला आहे. पण काही लोक त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. जेठालाल विमानतळावरून बाहेर पडतात तेव्हा ते लोकही त्याच्या मागे कारमध्ये येतात आणि गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकावर  हल्ला करतात. जेठालालला समजू शकत नाही की, काय होत आहे. तर हल्लेखोर जेठालालची बॅग हिसकावून पळून जातात.

जेठालाल यांच्यावर हल्ला का झाला?
आता हे सर्व पाहून शोचे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत की, जेठालालसोबत मुंबईत पोहोचल्यानंतर काय झालं आणि हे सर्व कोणी केलं. हे हल्लेखोर कोण आहेत आणि जेठालालच्या मागे का आहेत. अमेरिकेत असं काही घडलं आहे का? ज्याने जेठालालला वर पाळत ठेवून आहे?  किंवा हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे.

जेठालाल यांच्यावर हा संकटांचा डोंगर कोसळणार आहे, तर गोकुळधाम सोसायटीतील कावळ्यांचा शोध संपला आहे. मेहता साहेबांच्या वडिलांचं श्राद्ध संपन्न झालं कारण खूप कष्टानंतर शेवटी कावळ्याने श्राद्धाचं भोजन केलं आहे.