'तारक मेहता ...'मधील ही अभिनेत्री वयाच्या १९व्या वर्षी कास्टिंग काउचची झाली शिकार

'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो इतका लोकप्रिय झाला आहे की, आज या शोने प्रत्येक घरात एक विशेष स्थान मिळवलं आहे. 

Updated: Jul 17, 2021, 10:04 PM IST
 'तारक मेहता ...'मधील ही अभिनेत्री वयाच्या १९व्या वर्षी कास्टिंग काउचची  झाली शिकार  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो इतका लोकप्रिय झाला आहे की, आज या शोने प्रत्येक घरात एक विशेष स्थान मिळवलं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत या शोमध्ये कोणतंही पात्रे आली आहेत, त्यांनाही बरीच लोकप्रियता मिळाली आहे. त्याचबरोबर 'स्प्लिट्सविला 12' ची माजी स्पर्धक आराधना शर्माही नुकतीच 'तारक मेहता का उल्टा चश्म'मध्ये दिसली आहे. शोमध्ये आराधनाने 'दीप्ती जासूस' ची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली होती. दरम्यान, आराधनाने कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

ती ही घटना कधीच विसरू शकत नाही
एका मुलाखतीमध्ये बोलताना आराधना शर्माने वयाच्या 19व्या वर्षी स्वत: बरोबर असलेल्या कास्टिंग काऊचचा खुलासा केला. एका कास्टिंग एजंटने तिच्याबरोबर खूप चुकीचं काम केलं ज्यानंतर तिला खूप भीती वाटली, असं आराधना शर्माने सांगितलं. या घटनेचा तिच्यावर इतका परिणाम झाला की, ती डिप्रेशनमध्ये गेली. या मुलाखतीत आराधना शर्मा म्हणाली की, ' माझ्यासोबत घडलेली ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. ही घटना चार-पाच वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी मी पुण्यात शिकत होते. यावेळी शिक्षणासोबत मी पुण्यात राहून मॉडेलिंगही करत होते. त्या काळात मला कळालं की, एक व्यक्ती मुंबईत आगामी प्रोजेक्टसाठी कास्टिंग करीत आहे.

चुकीच्या मार्गाने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला
आराधना शर्मा पुढे म्हणाली, 'मी आधीपासूनच मॉडेलिंग असाईनमेंट करत होते, म्हणून लोक मला थोडं ओळखायचे. यासाठी, मी माझ्या मूळ गावी रांचीला गेले, कारण मला तिथे मिटींगकरिता बोलावण्यात आलं होते. यानंतर, आम्ही स्क्रिप्ट वाचत खोलीत बसलो होतो. तेव्हा त्या व्यक्तीने मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा . काय घडत आहे हे त्यावेळी मला थोडावेळ समजूच शकलं नाही. मला आठवतंय की, मी त्याला ढकललं  आणि दार उघडून मी पळत गेले. मी हे काही दिवस कोणालाही शेअर  करू शकले नाही. ही घटना माझ्यासाठी खूप वाईट होती.

अगदी वडिलांसोबत देखील एकाच खोलीत राहू शकत नाही
आराधना शर्मा म्हणाली, 'कास्टिंग काऊचच्या घटनेने मला आतून इतकी भीती निर्माण केली की, मी माझ्या वडिलांच्या खोलीत देखील एकटी राहू शकत नाही. जेव्हा माझ्यासोबत ही घटना घडली तेव्हा मी फक्त 19 किंवा 20 वर्षांची होतो. माझ्यासाठी हा खरोखर खूप गलिच्छ आणि वाईट अनुभव होता.''