Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली आहे. आता तिची जागा खुशी मालीने घेतली आहे. पलकने गेल्या 5 वर्षांपासून सोनू भिडेची भूमिका साकारली असून आता तिच्या जागी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत खुशी माली दिसणार आहे. जी शेवटची 'सहज सिंदूर'मध्ये दिसली होती.
आता खुशी माली 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत सोनूची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले की, 'सोनू हा टप्पू सेनेचा एक आवश्यक भाग आहे. तिच्या उपस्थितीने मालिकेने नेहमीच चांगले काम केले आहे.
खुशी मालीबद्दल निर्माते काय म्हणाले?
खुशीला कास्ट करणे हा योग्य निर्णय होता. आम्हाला विश्वास आहे की ती हे पात्र उत्तम प्रकारे आत्मसात करत आहे. खुशीचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. तिला पूर्ण पाठिंबा देऊ कारण तिला ही भूमिका साकारण्यात खूप रस आहे. आम्हाला आशा आहे की आमचे प्रेक्षक तिला देखील तेवढेच प्रेम देतील जे त्यांनी गेल्या 16 वर्षांपासून या मालिकेतील सोनूच्या पात्राला दिलं आहे.
कोण आहे खुशी माली?
खुशी माली ही एक मॉडेल आहे आणि नंतर ती अभिनेत्री झाली. खुशी म्हणाली की, 'सोनूची भूमिका साकारणे मनोरंजक असेल कारण तिच्याकडे अनेक गुण आहेत. तसेच 'तारक मेहता'चा एक भाग असणे ही माझ्यासाठी आशीर्वाद आणि विशेष संधी आहे. मी माझ्या भूमिकेतून जनतेशी जोडण्यास उत्सुक आहे.
पलक सिधवानीचा निर्मात्यांसोबत वाद
सध्या पलक निर्मात्यांसोबत कायदेशीर लढाईमध्ये अडकली आहे. तिला कराराचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. अभिनेत्रीने मालिका सोडल्यानंतर देखील निर्माते तिच्या मार्गात अनेक अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे. पलकने ही भूमिका 5 वर्षे केली आहे. 'तारक मेहता' हा टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारी मालिकांपैकी एक आहे.