Looop Lapeta मध्ये तापसी पन्नूचा बोल्ड लूक, होतेय चर्चा

 'लूप लपेटा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 

Updated: Jan 13, 2022, 08:05 PM IST
Looop Lapeta मध्ये तापसी पन्नूचा बोल्ड लूक, होतेय चर्चा title=

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांच्या कॉमेडी-थ्रिलर 'लूप लपेटा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तापसी पन्नूचा हा असा एक चित्रपट आहे, ज्यामधून तिचा अतिशय बोल्ड लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यातील बोल्ड सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

चित्रपटातील तापसीची भूमिका अशी आहे की, ती ताहिर राज भसीनने साकारलेला तिचा प्रियकर सत्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, जेव्हा तो जुगाराच्या बोलीत लाखो रुपये गमावतो. त्यानंतर तापसी तिच्यासाठी जीव ओतते. हा चित्रपट 'रन लोला रन' या जर्मन प्रायोगिक थ्रिलरवर आधारित आहे. हा चित्रपट दिग्दर्शक आकाश भाटियाने दिग्दर्शित केला आहे.

ट्रेलर लाँचच्यावेळी आपलं मत व्यक्त करताना ताहिर म्हणाला, ''एक महिन्याच्या आत Netflix सोबत माझा दुसरा प्रोजेक्ट रिलीज करण्यासाठी आणि आता सत्या आणि सावीची रोलरकोस्टर राइड प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.आयुष महेश्वरीसह सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि इलिपसिस एंटरटेनमेंट निर्मित, 'लूप लपेटा' 4 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रिमियर होणार आहे.