मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नूचा 'शाबाश मिठू' हा चित्रपट 15 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित आणि प्रिया एवेन लिखित हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या जीवनावर आधारित आहे.
मिताली राजवर आधारित चित्रपट
23 वर्षांच्या कारकिर्दीत, मितालीने वन-डे क्रिकेट मॅचमध्ये सलग 7 वेळा 50 धावा केल्या आणि भारताला चार विश्वचषक जिंकून दिले. या चित्रपटात आठ वर्षांची मुलगी होण्यापासून ते क्रिकेट लीजेंड बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.याआधी नुकताच, तापसीने तिच्या इंस्टाग्रामवर नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.
लिहिलं खास कॅप्शन
तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी योजना असलेल्या मुलीपेक्षा काहीही शक्तिशाली नाही! ही एका मुलीची कथा आहे जी बॅट हातात घेवून क्रिकेटमध्ये तिच्या स्वप्नाचा पाठलाग करते. हा चित्रपट 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ." या चित्रपटाची निर्मिती कोलोसियम मीडिया आणि वायाकॉम18 स्टुडिओज यांनी केली आहे.