अभिनेत्री स्वरा भास्करने 'पद्मावत'वरुन भंसालींना सुनावलं

फिल्म पद्मावतबाबत एका बॉलिवूड अभिनेत्रीने दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भंसालीला पत्र लिहून चांगलंच सुनावलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 28, 2018, 01:08 PM IST
अभिनेत्री स्वरा भास्करने 'पद्मावत'वरुन भंसालींना सुनावलं title=

मुंबई : फिल्म पद्मावतबाबत एका बॉलिवूड अभिनेत्रीने दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भंसालीला पत्र लिहून चांगलंच सुनावलं आहे.

सिनेमावर प्रश्नचिन्ह

अभिनेत्री स्वरा भास्करने फिल्म पद्मावतीमध्ये दाखवण्यात आलेल्या सतीप्रथा आणि जौहर प्रथेच्या विरोधात आवाज उठवला आहे. स्वराने संजय लीला भंसालींना पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे.

काय बोलली स्वरा

'21व्या शतकातही महिलांच्या अब्रुच्या आजुबाजुलाच सर्व गोष्टी का फिरतात. विधवा, बलात्कार पीडित महिलांना जगण्याचा अधिकार नाही का?'

लोकांची मात्र पसंती

करणी सेनेच्या विरोधातही हा सिनेमा रिलीज झाला. संजय लीला भंसालीच्या पद्मावतने बॉक्स ऑफिसवर कमाई सुरु ठेवली आहे. राजपूत आणि महारानी पद्मावतीबाबतच्या या सिनेमाला लोकांनी गर्दी केली आहे. पण आपल्या बोल्ड आणि अप्रतिम अॅक्टींगसाठी ओळखली जाणारी स्वरा भास्करने सिनेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.