मुंबई : आज सर्वत्र रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा सण साजरा होत आहे. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. बहीण भावाच्या दिर्घायुष्यसाठी प्रार्थना करते आणि भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणींला तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. पण सुशांतच्या बहिणींकडे आज तो हात नाही, ज्याला त्या राखी बांधू शकतील. १४ जुन रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून या जगाचा निरोप घेतला आणि आपल्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना ऐकटं सोडून गेला.
'गुलशन, मेरा बच्चा' अशा भावूक शब्दांचा वापर करत सुशांतच्या बहिणीने एक पत्र लिहिलं आहे. 'आज ३५ वर्षांनंतर असा आपल्या आयुष्यात आला आहे. तुला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट तयार आहे, त्यामध्ये दिवा देखील आहे, पण आरती करण्यासाठी तो चेहरा नाही. कुंकू आहे पण टिळा लावण्यासाठी तुझं कपाळ नसल्याचं म्हणतं त्याची बहीण पुढे म्हणते.
मिठाई आहे पण तोंड गोड करण्यासाठी तू नाहीस, कधीही विचार केला नव्हता की आपल्या आयुष्यात असा दिवस येईल. तुझ्याकडून खूप काही शिकली आहे. आता तुझ्या शिवाय एकटी कशी नव्या गोष्टी शिकू असं भावूक पत्र लिहित गेल्या वर्षीच्या अठवणींना उजाळा दिला आहे.
सुशांतला चार बहिणी आहेत. त्यामधील रानी दीने भावूक होत त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत.