सुशांतच्या बहिणीने भावाच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट

जखम सहजासहजी भरत नाही

Updated: Nov 24, 2020, 01:35 PM IST
सुशांतच्या बहिणीने भावाच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आता ५ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. पण अजूनही त्याचे कुटुंबिय या दुःखातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या बहिणीने (Shweta Singh Kirti) आताही एक भावनिक पोस्ट (Emotional Post)  शेअर करत #JusticeForSushantSinghRajput असा हॅशटॅग वापरत पोस्ट शेअर केली आहे. 

श्वेताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'मी खूप दुःखातून गेले आहे आणि अजूनही जात आहे. जेव्हा मला वाटतं की आता मी सामान्य जीवन जगू शकते. तेव्हाच असं काही तरी घडतं आणि मी पुन्हा दुःखाच्या दरीत कोसळते. जखण सहजासहजी भरत नाही त्यासाठी आपल्याला थोडा संयम ठेवायला हवा.'

'जो भाऊ ज्याच्यासोबत आम्ही आतापर्यंतचा संपूर्ण काल घालवला. तो आमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता. आम्ही एकत्र आलो की आम्ही एक असायचो. आता तो माझ्यासोबत नाही ही गोष्ट मला समजून घेण्यासाठी वेळ लागेल. परमेश्वर कधी आपल्या भक्तांना हरू देत नाही.'

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी वांद्रे येथे गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाची ईडी चौकशी देखील झाली. या प्रकरणाच ड्रग्स कनेक्शन असल्याचं देखील समोर आलं.