Suriya Cries : गेल्या वर्षी म्हणजेच 28 डिसेंबर 2023 मध्ये तमिळ चित्रपटातील सुपरस्टार विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला. संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्यानंतर रजनीकांत यांच्यासोबतच कमल हासनपासून अनेक कलाकारांनी त्यांची आठवण काढली. जवळपास एक आठवड्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता सूर्या पोहोचला. विजयकांत यांची समाधी पाहिल्यानंतर सूर्याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
काल 5 जानेवारी रोजी दाक्षिणात्य दिवंगत अभिनेता विजयकांत यांच्या मेमोरियलवर सुर्या पोहोचला होता. तिथे त्यानं विजयकांत यांच्या समाधिवर फूलं अर्पण केली आणि त्यासोबत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी सूर्याला अश्रू अनावर झाले आणि बराचवेळ तो समाधिजवळ बसून होता. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
கண்முன் நிழலாடிய நினைவுகள்; கண்ணீர்விட்ட சூர்யா#ActorSuriya | #Suriya | #Vijayakanth pic.twitter.com/lfeiT9HMxJ
— PuthiyathalaimuraiTV (@PTTVOnlineNews) January 5, 2024
सूर्यानं यावेळी मीडियाशी संपर्क साधला. त्यावेळी विजयकांत यांच्या निधनाविषयी बोलताना म्हणाला की त्याला खूप वाईट वाटलं. तो त्यांच्या खूप जवळ होते. सूर्यानं विजयकांत यांच्यासोबत 1999 मध्ये एका चित्रपटात काम केले होते. सूर्यानं त्यांच्याविषयी बोलताना सांगितलं की 'मला त्यांच्यासोबत पेरियाना या चित्रपटामध्ये काम केलेला काळ आठवला. सेटवर त्यांनी एका भावासारखी माझी काळजी घेतली. जेव्हा त्यांनी पाहिलं की व्यवस्थीत जेवत नाही आहे, तेव्हा त्यांनी मला निरोगी राहण्यास सांगितलं आणि काम करण्यासाठी मी खात रहायला हवं. त्या दिवसात, त्यांच्यासारखे लोकप्रिय कलाकारांनी माझ्यासारख्या न्यूकमरसोबत जेवण करणं ही खूप मोठी गोष्ट होती.'
#Actor suriya at Vijaykanth Funeral pic.twitter.com/PPrZigcnIv
— Kolly Censor (@KollyCensor) January 5, 2024
पुढे सूर्यानं हे देखील सांगितलं की विजयकांत यांनी त्यांच्या टीमला सांगितलं होतं की त्या कलाकाराची चांगली काळजी घ्या. त्याविषयी बोलताना सूर्या म्हणाला, 'मी त्यांना खूप मानतो. ते माझे आदर्श होते. ते जमिनीशी जोडलेले होते. प्रत्येक गरजूसाठी ते उभे रहायचे. मला खूप मोठा धक्का बसला. मी तर त्यांना शेवटचं पाहिलं सुद्धा नाही आणि नाही त्यांच्या अंत्ययात्रेत शामिल होऊ शकलो.'
हेही वाचा : धोनीनं केलं MS STAN सोबत काम! चक्रावलेले नेटकरी म्हणाले, 'काय मजबूरी होती?'
विजयकांत यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनय क्षेत्रानंतर विजयकांत यांनी राजकारणात प्रवेश केला होता आणि त्यांनी DMDK नावानं पार्टी सुरु केली होती. गेल्या काही महिन्यांपासून विजयकांत यांची तब्येत खालावली होती. त्याशिवाय विजयकांत यांना सतत खोकला होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.