मराठमोळ्या अभिनेत्रीला 'Sexy Video पाठव' असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, 'तुमची आई बहिण...'

या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्या अभिनेत्रीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. इतकंच काय तर त्या विकृत व्यक्तीनं तिला या आधी देखील अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे तिनं सांगितले. अभिनेत्रीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Mar 17, 2023, 06:33 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीला 'Sexy Video पाठव' असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, 'तुमची आई बहिण...' title=

Surabhi Bhave reply to netizens over sexy video demand : मराठी अभिनेत्री सुरभी भावे (Surabhi Bhave) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सुरभी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुरभी सध्या सोशल मीडियाच्या होणाऱ्या चुकीच्या वापरावर सुरभीनं संताप व्यक्त केला आहे. नेटकरी कशा प्रकारे सेलिब्रिटींना मेसेज करतात आणि त्यासगळ्याला सेलिब्रिटी कसा सामना करतात हे सुरभीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. सुरभीनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

सुरभीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक नेटकरी सुरभीला सतत मेसेज करत असल्याचे दिसत आहे. त्याचा स्क्रिनशॉट सुरभीनं शेअर केला आहे. यात तो नेटकरी म्हणाला की, हॅलो तू सेक्सी व्हिडीओ शेअर कर. पुढे तो नेटकरी म्हणाला, तुला आवडतात का मी शेअर केलेले व्हिडीओ. त्यावर संतापलेल्या सुरभीनं सडेतोड उत्तर दिले आहे. 'तू तुझ्या आईला पाठव असले व्हिडीओ. त्यांना आवडले तर मी बघेन. हे सगळं मी आधीच सायबर क्राइमला कळवलं आहे.' त्यावर उत्तर देत तो नेटकरी म्हणतो, 'आईवर नको जाऊ बावळट.' (Surabhi Bhave Post)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या नेटकऱ्याविषयी सांगत सुरभीनं एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत सुरभीनं कॅप्शन दिलं की, '@sudhirtakalkar या नेटकऱ्यानं मला अनेकवेळा अश्लील व्हिडिओ पाठवले पण मी सतत दुर्लक्ष केलं, त्यानंतर या दोन दिवसांत त्यानं पुन्हा पाठवले मग मी रिप्लाय दिला, जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे. त्यांच्या आईचा यात अवमान करणे हा उद्देश नव्हता पण त्यांना झोंबल ते अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते. तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का नीच लोकहो " ?? इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाचा असाच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिकरित्या नागडं केलं जाईल (उघडं पाडलं जाईल) याची नोंद घ्यावी. P.S. याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही.'

नेटकऱ्यांनी सुरभीला दिला पाठिंबा

सुरभीची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. एक नेटकरी म्हणाला की, याला शोधून पोलिसांनी चोप दिला पाहिजे. दुसरा नेटकरी म्हणाला, जिजाऊंच्या महाराष्ट्रात तुझ्या सारख्या वाघिणीने असंच वागले पाहिजे. तिसरा नेटकरी म्हणाला, मानसिक विकृती. यांना वेळीच ठेचलं पाहिजे...! अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी सुरभीला पाठिंबा दिला आहे. 

हेही वाचा : वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न! लोकप्रिय Actor च्या घरी चिमुकलीचं आगमन

सुरभीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ‘स्वामिनी’ या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली होती. सुरभीनं ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोलच्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटातही सुरभी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.