मस्ती करणाऱ्या सनीने विचारही केला नसेल की 'असं काही होईल'

सनी काही तरी हालचाल करेल याआधीच तिच्या मागे उभी असलेली मैत्रिण तिला पाण्यात ढकलून देते. 

Updated: Feb 8, 2019, 09:50 PM IST
मस्ती करणाऱ्या सनीने विचारही केला नसेल की 'असं काही होईल' title=

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री सनी लिऑनी सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असते. आपल्या मित्र परीवारासोबतचे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करणे तिने खूप आवडते. आपल्या फॅन्सशी बोलताना ती एक लहान मुलगीच होऊन जाते. त्यामुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तेव्हा अचानक मस्करीमध्ये तिला कोणीतरी पाण्यात ढकलून देते.

सनीने शेअर केला व्हिडीओ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Well this prank didn’t exactly go the way I wanted but still funny! Sorry @hitendrakapopara and @jeetihairtstylist I will be coming for you! War is on!! @tomasmoucka @sonakshivip @rangeela_movie

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी काही तरी हालचाल करेल याआधीच तिच्या मागे उभी असलेली मैत्रिण तिला पाण्यात ढकलून देते. हे बघून आजुबाजूचे लोक हसू लागतात.  'हे प्रॅक मी ठरवलंय त्या पद्धतीने झाले नाही पण मज्जा आली' अशी कॅप्शन सनीने लिहिली आहे. तिने हितेंद्र कपोपारा आणि हेअर स्टाइलिस्ट जीतीला टॅग केले. 'युद्ध आता सुरू झाले आहे मी बदला घेणार' असेही लिहीले.  यासोबतच तिने रंगीला सिनेमाला यात टॅग केले. यातून ते सिनेमाच्या शूटींगसाठी असल्याचा अंदाज लावता येऊ शकतो. 

Image result for sunny leone zee news

सनी सध्या आपल्या आगामी सिनेमातून मल्याळम सिनेसृष्टीत पाऊल टाकायला जात आहे. त्यामुळे साऊथमध्ये सध्या सनी लिऑनीचीच चर्चा आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. 'रंगीला' सिनेमामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नव्हे तर मल्याळम सुपरस्टार माम्मुटीसोबत ती एक गाणे देखील शूट करत आहे. माम्मुटी सोबत ती 'धूम राजा' गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. सनीने रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल टाकले होते. ती बॉलीवुडमध्ये पहिल्यापासूनच चर्चेत होती. आचा साऊथमध्ये हंगामा करण्यास ती सज्ज झाली आहे.