सनीला ड्रायव्हरने पाठवला 'डर्टी' मेसेज आणि मग.....

काही वेळेस मेसेज पाठवताना तो चुकीच्या व्यक्तीला जातो. अनावधानाने असे होते. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 30, 2017, 01:09 PM IST
सनीला ड्रायव्हरने पाठवला 'डर्टी' मेसेज आणि मग..... title=

नवी दिल्ली : काही वेळेस मेसेज पाठवताना तो चुकीच्या व्यक्तीला जातो. अनावधानाने असे होते. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल.

असेच काहीसे बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनीसोबत झाले. सनीच्या ड्रायव्हरने एक 'डर्टी' मेसेज सनीला पाठवला. मात्र त्यामुळे त्याला खूप लाजल्यासारखे झाले आणि तो कामावर परत आलाच नाही. 

 प्रमोशनमध्ये व्यस्त

सनी सध्या अरबाज खानसोबत 'तेरा इंतजार' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत सनीला आणि अरबाजला विचारण्यात आले की, तुम्ही कधी चुकून कोणाला 'डर्टी' मेसेज पाठवला आहे का? 

 सनीने शेअर केला किस्सा 

यावर अरबाज म्हणाला की, असे होत असते. तर सनीने एक खास किस्सा शेअर केला. तिच्या ड्रायव्हरने एक 'डर्टी' मेसेज तिला पाठवला. त्यानंतर तो म्हणाला की, मला माफ करा. चुकून हा मेसेज तुम्हाला आला. मी हा दुसरं कोणाला तरी पाठवत होतो. मात्र त्यानंतर तो कधीच माझ्यासमोर आला नाही.

सोशल मीडियावर अॅक्टीव

आपल्या स्‍टाफसोबत सनीचे अत्यंत खेळीमेळीचे नाते आहे. त्यांच्यासोबतच फोटोज, मज्जेशीर किस्से, व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच सनीचा सापाचा प्रॅंक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. 
राजीव वालिया दिग्दर्शित  'तेरा इंतजार' हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.