खर्‍या आयुष्यात डॉ.मशहूर गुलाटींंना पाहिल्यावर सुनील ग्रोव्हर म्हणाला ....

हिंदी टेलिव्हिजनवर विनोदी अभिनेता कपिला शर्माचा ' कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' हा कार्यक्रम चांगलाचा गाजला. दरम्यान सुनील आणि कपिलमध्ये वाद झाल्याने अखेर हा कार्यक्रम बंद पडला. मात्र या कार्यक्रमातील  अनेक पात्र आजही लोकांच्या मनात आहेत. 

Updated: Mar 28, 2018, 09:17 PM IST
खर्‍या आयुष्यात डॉ.मशहूर गुलाटींंना पाहिल्यावर सुनील ग्रोव्हर म्हणाला ....  title=

 मुंबई : हिंदी टेलिव्हिजनवर विनोदी अभिनेता कपिला शर्माचा ' कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' हा कार्यक्रम चांगलाचा गाजला. दरम्यान सुनील आणि कपिलमध्ये वाद झाल्याने अखेर हा कार्यक्रम बंद पडला. मात्र या कार्यक्रमातील  अनेक पात्र आजही लोकांच्या मनात आहेत. 
 
 कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा या कार्यक्रमात गाजलेलं एक पात्र म्हणजे ' डॉ. मशहूर गुलाटी'. सुनील ग्रोव्हर हे खास पात्र रंगवत होता. पण या पात्रासारखाच एक व्यक्ती आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का ? तुम्हीही त्याचा फोटो पाहून थक्क व्हाल हे नक्की
 

श्रीलंकेत सापडला ' डॉ. मशहूर गुलाटी'चा जुडवा  

गायक आणि अभिनेता मेयांग चांग याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील व्यक्ती सुनील ग्रोव्हर साकारत असलेल्या डॉ. गुलाटी या पात्रासारखा दिसत आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना चांगने सुनील ग्रोव्हरलाही यामध्ये टॅग  केले आहे. 

 

सुनील ग्रोव्हरचा रिप्लाय  

चांगच्या ट्विटवर  सुनील ग्रोव्हरनेही तात्काळ रिप्लाय दिला. त्याने 'मला विश्वासच बसत नाही, कोणी असं कसं दिसू शकतं' ... 

   
 
सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे एकत्र येणार 

अभिनेता सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा यांचे एकत्र काही फोटो सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर कपिल शर्माच्या नव्या शोला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर नवा कार्यक्रम घेऊन येणार आहे अशी चर्चा रंगली होती. आता ही केवळ अफवा नसून खरंच सुनील नव्या कार्यक्रमाचा भाग झाला आहे.  

सुनील ग्रोव्हरसोबत शिल्पा शिंदे  

सुनील ग्रोव्हर बिग बॉसच्या 11 व्या पर्वाची विजेती शिल्पा शिंदेसोबत नवा कार्यक्रम घेऊन येणार आहे.  Lil Frodo Productions निर्मित  एक  क्रिकेट कॉमेडी डिजिटल शो येणार आहे. यामध्ये शिल्पा शिंदेसोबत सुनील ग्रोव्हर झळकणार आहे. प्रीती सिमोन या कार्यक्रमाची निर्माती आहे. 

कपिलचा नवा शो 

कपिल  शर्माचा नवा शो ' फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा कॉमेडी शो आहे. विनोद हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग असला तरीही यंदा त्यामध्ये फॅमिलीदेखील सहभाग घेणार आहे. 25 मार्चपासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे.