हार्ट सर्जरीनंतर सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा कामावर परतण्यासाठी सज्ज

कॉमेडीच्या दुनियेत सुनील ग्रोव्हरला कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं

Updated: Apr 10, 2022, 06:47 PM IST
हार्ट सर्जरीनंतर सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा कामावर परतण्यासाठी सज्ज title=

मुंबई : कॉमेडीच्या दुनियेत सुनील ग्रोव्हरला कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. सुनील ग्रोव्हर कोणत्याही पात्रात दिसतो. त्याचं प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून आहे. सुनीलने छोट्या पडद्यावर अनेक व्यक्तिरेखा साकारून लोकांना हसवलं आहे. कधी तो डॉक्टर गुलाटीच्या भूमिकेत दिसलाय. तर कधी त्याने  गुत्थी बनून लोकांना खूप हसवलं. सुनील ग्रोव्हरची कॉमिक टायमिंग अतुलनीय आहे.

पण सर्वांना हसवणाऱ्या सुनील ग्रोवरच्या हार्ट सर्जरीच्या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला होता. आज आम्ही सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत. सुनील ग्रोव्हरने पुन्हा एकदा स्टेजवर परफॉर्म दिले आहेत .सुनीलची प्रकृती खालावल्याने तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता.

अशा परिस्थितीत त्याची बायपास सर्जरी करावी लागली आणि शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्याच्या शस्त्रक्रियेला दोन महिने उलटून गेले आहेत आणि अशा परिस्थितीत तो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवताना दिसत आहे.  सुनील ग्रोव्हर त्याच्या प्रेक्षकांवर इतकं प्रेम करतो की, त्याला जास्त वेळ विश्रांती घेण्याची इच्छा नाही. अशा परिस्थितीत तो पटापट रिकव्हर होऊन त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एंट्री मारली.

काल संध्याकाळी सुनीलने ब-याच दिवसांनी हजेरी लावली. सुनीलने पुन्हा एकदा कॉमेडी शोमध्ये डॉक्टर गुलाटीची भूमिका साकारून प्रेक्षकांना खूप हसवलं. सुनीलचा हा लाईव्ह शो पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचा शो हाऊसफुल्ल होता. ब-याच दिवसांनी सुनील ग्रोव्हरला पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक दिसले.

अशा परिस्थितीत, जेव्हा त्याला बातमी मिळाली की, सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा लाइव्ह परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. तेव्हा त्याच्या शोचं ऑनलाइन तिकीट आधीच बुक झालं होतं. सुनील ग्रोव्हरचे पुनरागमन पाहून त्याचे चाहते खूप खूश झाले आणि त्यांनी शोमध्ये सुनील ग्रोव्हरच्या नावाचा जयघोष सुरू केला. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून सुनीलही खूश दिसला.