'माय बोम्मा..., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र

Sukesh Chandrashekhar सध्या दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली आहे. आज सुकेशचा वाढदिवस असून त्यानं त्यानिमित्तानं जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यानं जॅकलिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. 

Updated: Mar 25, 2023, 06:06 PM IST
'माय बोम्मा..., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र title=

Sukesh Chandrashekhar Wrote Letter to Jacqueline Fernandez On his Bithday : दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश त्याच्या आणि बॉलिवूड अभिनेत्रींसोबत असलेल्या त्याच्या नात्यामुळे सतत चर्चेत आहे. कधी नोरा फतेही (Nora Fatehi) तर कधी जॅकलीन फर्नांडिससोबतच नातं. आता तर सुकेशनं जॅकलीनला फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) पत्र लिहिले आहे. सुकेशनं त्याच्या वाढदिवसानिमित्तानं जॅकलीनला माय बेबी असं म्हणतं हे पत्र लिहिलं आहे. इतकंच काय तर तिच्यावर असलेलं त्याच प्रेम कधीही न संपणार आहे असं त्यानं त्या पत्रात म्हटलं आहे. 

या पत्रात सुकेशनं लिहिले की, माय बोम्मा.(माझी बाहुली ), माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे, मला तुझी खूप आठवण येते. माझ्याकडे शब्द नाहीत. पण मला माहित आहे की तुझे माझ्यावरील प्रेम कधीच संपणार नाही आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याला जे पाहिजे ते तिच्या हृदयात आहे आणि तिला कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहित आहे. जॅकलीनचे प्रेम तू व तुझ्या प्रेमाचं मोल नाही. हे मला मिळालेलं सर्वात मौल्यवान गिफ्ट आहे. लव्ह यू माय बेबी. तुझं प्रेम मला दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे सुकेशनं त्याच्या चाहत्यांना आणि समर्थकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहे. मला शेकडो शुभेच्छा देणारी पत्रे आली आहेत. मी आभारी आहे, धन्यवाद. सुकेशनं होळीच्या दिवशी देखील जॅकलिनला एक पत्र लिहिलं होतं. त्यात सुकेश म्हणाला, माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा, जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे. 

हेही वाचा : 'माझ्यामुळे Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाला', Ajay Devgn चा दावा

सुकेशचे मनी लॉंड्रींग (Money Laundering Case) प्रकरणात जॅकलिन आणि नोरा फतेहीचे नाव जोडले गेले होते. त्यानंतर त्या दोघींची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र जॅकलिनने सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांवर नकार दिला होता. सुकेशनं जॅकलिनला हँडबॅग, दागिने, आलिशान कार अशा अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्याचे तपासात उघड झाले आहे.