मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चाहत खन्ना आणि उर्फी जावेद यांच्यात असलेली कॅटफाईट ही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. उर्फी आणि चाहत एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कॉनमन सुकेश चंद्रशेखर विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्यासोबत चाहतचं नाव देखील समोर आलं आहे. अशात उर्फीनं चाहतची खिल्ली उडवताच चाहतनं तिला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे त्या दोघांच्या वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
चाहतनं सुकेशची तुरुंगात भेट घेतली होती आणि त्याच्याकडून मौल्यवान भेटवस्तूही घेतल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर उर्फीने चाहतवर कमेंट केली. चाहत रागाने उर्फीला दीदी म्हणाली, तर उर्फी चाहतला आंटी म्हणाली. उर्फीने चाहतला गोल्ड डिगरही म्हटले. आता चाहतने उर्फीला सडेतोड उत्तर दिले आहे.
चाहतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत चाहतं म्हणाली, 'सत्य जाणून न घेता प्रसिद्धीसाठी या सगळ्या प्रकरणात बोलणं म्हणजे सगळ्यांसमोर स्वतःला मूर्ख असल्याचे दाखवत आहात. ब्रेनलेससोबत काय वाद घालायचा. हुशार असती तर तिनं काम केल असतं किंवा शूट केलं असतं, सेमी न्यूड स्पॉट केलं नसतं. चल जाऊदे, तू तर काकू, पत्नी किंवा आई होण्याच्याही लायक नाहीस, तर आता दुसऱ्यांना काकू बोल आणि खूश रहा. अल्लाह तुला बुद्धी देओ. #javed' चाहतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
'मी सॉरी तुझ्या घटस्फोटाबद्दल बोलल्यामुळे म्हटलं होतं. एका अनोळखी व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू घेण्यासाठी तुरुंगात जाण्यासाठी मी तुला सॉरी का म्हणेन? स्वत: ची लाज काढणं बंद कर. तू माझ्या कपड्यांवर कमेंट केलीस, तर तू स्वत: पैसे घेण्यासाठी तुरुंगात एका अनळोखी व्यक्तीला भेटलीस. हनी, कॉम्पीटीशनचं नाही', असे उर्फी म्हणाली होती.
पुढे उर्फी म्हणाली, 'पण हो, मला माफ कर. मला वाटलं की माझ्यासोबत असलेला वाद हा तुझ्या करिअरचा हायलाइट पॉइंट असेल, पण या वादाला कोणीही हरवू शकत नाही. तू नेहमी गोल्ड डिगर म्हणून ओळखली जाशील आणि मी विचित्र कपडे परिधान करणारी मुलगी म्हणून ओळखली जाईल. नंतरचं चांगल आहे.
दरम्यान, सुकेशच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला आज पुन्हा एकदा EOW ऑफिसमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. जॅकलिनसोबत फॅशन डिझायनर लिपाक्षी देखील आज सकाळी 11 वाजता ईओडब्ल्यू कार्यालयात चौकशीसाठी पोहोचतील.