'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार

'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये कमाईच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. 2024 मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा  'स्त्री 2' हा तिसरा चित्रपट ठरणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 18, 2024, 04:41 PM IST
'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार title=

Stree 2 Worldwide Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत आहे. 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. आज हा चित्रपट जगभरात 200 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.  

'स्त्री 2' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रसिद्ध झाला. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हा हॉरर आणि कॉमेडी चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये जगभरात 188 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर हा चित्रपट या वर्षातील जगभरातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

'स्त्री 2' ने 'शैतान'ला मागे टाकले

'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट बनू शकतो. 'स्त्री 2' या चित्रपटाने क्रिती सेनॉनच्या 'क्रू' या चित्रपटाला मागे टाकले आहे. अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटाने जगभरात 211 कोटींची कमाई केली होती. पण 'स्त्री 2' चे दमदार कलेक्शन बघता असे दिसते की तो 'शैतान' या चित्रपटाला रविवारच्या कलेक्शनमध्ये मागे टाकू शकतो. ह्रतिक रोशनच्या 'फायटर'ने पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

2018 च्या 'स्त्री'चा सिक्वेल

'स्त्री 2' हा चित्रपट 2018 मधील 'स्त्री' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. तर पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर 'स्त्री 2' मध्ये वरुण धवन आणि अक्षय कुमार यांचाही कॅमिओ आहे.