साऊथ स्टार धनुष पुन्हा प्रेमात! लवकरच या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?

धनुष केवळ साऊथच नव्हे तर बॉलीवूडमधीलही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्याने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असलेला धनुष यावेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

सायली कौलगेकर | Updated: Aug 14, 2023, 03:06 PM IST
साऊथ स्टार धनुष पुन्हा प्रेमात! लवकरच या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? title=

मुंबई : साऊथ स्टार अभिनेता धनुष हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. धनुषचा सोशल मीडियावर खुप मोठा चाहता वर्ग आहे. धनुष केवळ साऊथच नव्हेतर बॉलिवूडचा प्रसिद्द अभिनेता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धनुष त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. पुन्हा अभिनेता त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. आणि ही बातमी साऊथचा सुपरस्टार धनुषशी संबंधित आहे.

धनुष केवळ साऊथच नव्हे तर बॉलीवूडमधीलही एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्याने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असलेला धनुष यावेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

गेल्यावर्षी धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतला. दोघंही विभक्त होत असल्याची पोस्ट या दोघांनी सोशल मीडियावर शेअर करुन त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.  मात्र गेल्या वर्षीच दोघंही कायमचे वेगळे झाले आणि दोघांना दोन मुलं आहेत. अनेक वर्ष संसार थाटल्यानंतर अचानक घटस्फोटाच्या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ माजली होती. रिपोर्ट्सनुसार, या कपलच्या त्यांच्या घटस्फोटाचं कारण धनुषचे विवाहबाह्य संबंध होते. पण धनुषशी कोणत्याही अभिनेत्रीचे नाव थेट जोडलं गेलं नाही.

मात्र घटस्फोटानंतर धनुष पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष आणि साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीना लवकरच एकमेकांसोबत लग्न करणार आहेत. धनुष आणि मीनाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी चित्रपट वर्तुळात आगीसारखी पसरत आहे. हे दोघं या वर्षी जुलै महिन्यात सप्तपदी घेणार असल्याचं बोललं जात होतं मात्र असं काही घडलं नाही. मात्र यांच्या लग्नाच्या बातमी वाऱ्यासारख्या पुन्हा एकदा पसरत आहे.   

मीना साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीने २००९ मध्ये विद्यासागरसोबत लग्न केलं. दोघांनाही एक मुलगी आहे. मात्र अभिनेत्रीचे पती विद्यासागर यांचं कोरोनामुळे निधन झालं.

मात्र, आता 39 वर्षीय धनुषचे नाव त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. मात्र समोर येणाऱ्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं मिना यांचा म्हणणं आहे. याचबरोबर माझ्या नवऱ्याच्या निधन नुकतंच झालं आहे आणि या अशा अफवा पसरवणं म्हणजे एक प्रकारचा मुर्खपणा आहे मग लोक असं कसं बोलू शकतात असं मिना म्हणाल्या.''

पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आल्यामुळे आता यावर या दोघांची काय प्रतिक्रीया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या धनुष त्याच्या आगामी सिनेमामध्ये व्यस्त आहे. लवकरच अभिनेत्याचा   'D51' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं दिग्दर्शन शेखर कममुला करणार आहेत. या सिनेमाच्या निमीत्ताने रश्मिका आणि धनुष पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.