सासरच्या दबावामुळं प्रसिद्ध अभिनेत्याने उचललं मोठं पाऊल... खरं कारण आलं समोर

पण या सेलिब्रिटींमध्ये एक असा स्टार आहे ज्याने आपल्या पहिल्या लग्नाचालाच दुसरी संधी देण्याचा विचार केला आहे.

Updated: Oct 5, 2022, 01:10 PM IST
सासरच्या दबावामुळं प्रसिद्ध अभिनेत्याने उचललं मोठं पाऊल... खरं कारण आलं समोर title=

Dhanush And Aishwarya Divorce: सध्या मनोरंजन विश्वात घटस्फोट घेण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. आमीर खान (Amir Khan Divorce) हे सध्या अगदी ताज उदाहरण म्हणता येईल. लग्नाच्या काही काळानंतर अनेक तारे एकमेकांपासून वेगळे झाले तर काही तारे एकमेकांशी जुळत नसल्यानं बऱ्याच काळानंतर वेगळे झाले आणि घटस्फोट घेतला. (south indian superstar dhanush and his wife are thinking to call off their decision of divorce)

पण या सेलिब्रिटींमध्ये एक असा स्टार आहे ज्याने आपल्या पहिल्या लग्नाचालाच दुसरी संधी देण्याचा विचार करतो आहे आणि त्या अभिनेत्याचे नाव आहे धनुष (Dhanush). दक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता धनुषनं (South Indian Superstar Dhanush) काही महिन्यांपुर्वीच पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोटाची घोषणा केली होती परंतु आता धनुष त्याच्या लग्नाला दुसरी संधी देण्यास तयार असल्याची बातमी समोर येत आहे. 

धनुषवर आहे सासऱ्यांचा दबाव?
साऊथचा सुपरस्टार धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची मुलगी ऐश्वर्याच्या (Rajnikanth Daughter Aishwarya) घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. त्याचवेळी या जोडप्याने आपला विचार बदलला असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. जानेवारीमध्ये या जोडप्याने जाहीर केले की ते आता यापुढे एकमेकांसोबत एकत्र राहू शकत नाहीत. पण आता या जोडप्याला त्यांना त्याच्या लग्नाला दुसरी संधी द्यायची असल्याचे कळते आहे. (Dhanush and Aishwarya Divorce) 

मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्ही कुटुंबांची रजनीकांतच्या घरी भेट झाली आहे जिथे दोघांनी त्यांच्या नात्यावर पुनश्च विचार करण्याचे योजिले आहे असे कळते. रजनीकांत यांनी आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत असेही समोर येते आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या वर्षाच्या सुरुवातीला धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, आम्ही 18 वर्षे एकमेकांसोबत मित्र म्हणून आणि मुलांचे पालक म्हणून घालवली आहेत पण आज आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.