प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचे कर्करोगामुळे निधन, दोन वर्षांपूर्वीच झालं होतं निदान

South Indian popular Actress Death : दाक्षिणात्य अभिनेत्रीनं वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिक्षा पाटील | Updated: Jul 12, 2024, 04:46 PM IST
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचे कर्करोगामुळे निधन, दोन वर्षांपूर्वीच झालं होतं निदान title=
(Photo Credit : Social Media)

South Indian popular Actress Death : अनेक दिवसांपासून कॅन्सरविषयी आपण सतत ऐकतोय किंवा वाचतोय. नुकतीच अभिनेत्री हिना खानविषयी बातमी आली होती की तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तर त्यासोबत तिला चौथ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची देखील माहिती समोर आली होती. सध्या हिना उपाचर घेत आहे. त्यासोबत आता दुसरीकडे ही बातमी समोर आली आहे की दाक्षिणात्य अभिनेत्रीला कॅन्सरमुळे तिचा जीव गमवावा लागला आहे. आता ही अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर ‘बिग बॉस कन्नड’ च्या सीझन 1 ची स्पर्धक अपर्णा वस्तारे आहे. ती कन्नड इंडस्ट्रीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ही माहिती समोर आली की ती गेल्या दोन वर्षांपासून ती फुफ्फुसांचा कॅन्सरला लढा देत होती. 

अपर्णा वस्तारे अभिनेत्रीसोबत सुत्रसंचालक देखील होती. 1998 मध्ये तिनं दिवाळीच्या कार्यक्रमाचे तब्बल 8 तास शोचे सुत्रसंचालन करत एक नवा रेकॉर्ड बनवला होता. कन्नडमध्ये तिचे लाखो चाहते आहेत. इतकंच नाही तर जर अपर्णाच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर तिनं 1984 मध्ये पुट्टन्ना कनागल यांचा अखेरचा चित्रपट ‘मसनदा हूवु’ मधून डेब्यू केला होता. तिनं अनेक टिव्ही शोजमध्ये काम केलं. 

अपर्णाच नाही जिनं बंगळुरु मेट्रोच्या घोषणांमध्ये आवाज दिला होता. तिनं कन्नड रिअॅलिटी शो 'बिग बॉसच्या सीझन 1' शिवाय लोकप्रिय कॉमेडी शो ‘माजा टॉकीज’ मध्ये तिनं ‘वरालक्ष्मी’ च्या भूमिकेत दिसली होती. यात तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा सुरु होती. आता तिच्या निधनानं इंडस्ट्रीत सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्यासोबत चित्रपट, छोट्या पडद्यावरली, साहित्यिक आणि राजकारण्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : काय सांगता, अरमान मलिक करणार तिसरं लग्न? पहिल्या पत्नीनेच केली पोलखोल

अपर्णा वस्तारेच्या निधनावर सिद्धारमैया यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. अपर्णाच्या निधनाची बातमी ऐकूण दु: ख झालं. ती तिच्या अभिनयासाठी आणि प्रतिभेसाठी ओळखली जात होती. ती खूप लवकर आपल्या सगळ्यांना सोडून गेली. तिच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिचे चाहते देखील श्रद्धांजली देताना दिसत आहेत.