मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये अतिशय गाजलेली जोडी म्हणून नावारुपास आलेल्या समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या नात्याला गालबोट लागलं. समंथा आणि नागा चैतन्य यांनी चार वर्षांच्या वैवाहिक नात्य़ाला संपवत काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली. ज्यानंतर समंथा आणि खुद्द नागा चैतन्य या दोघांनीही माध्यमांसमोर येणं टाळलं. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापासून ही जोडी दूरच राहत असल्याचं दिसून आलं.
आता मात्र समंथा घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आली आहे. तिच्या फेव्हरेट फॅशन लेबलला सपोर्ट करण्यासाठी म्हणून समंथानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. सोबतच एक कॅप्शनही लिहिलं आहे. येऊ घातलेल्या Lakme Fashion Week च्या निमित्तानं समंथानं ही पोस्ट शेअर केली आहे.
पांढऱ्य़ा रंगाच्या जाळीदार आऊटफिटमध्ये समंथा शोभून दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर शून्य भाव असले तरीही हा चेहरा खुप काही बोलून जात आहे. तिच्या या सौंदर्य़ामध्ये पांढऱ्या आणि फिक्या गुलाबी रंगांची फुलं चार चाँद लावून जात आहेत. समंथाचं हे रुप फॉलोअर्सच्या पसंतीस आलं असून, फोटोला अनेकांनीच लाईक केलं आहे.
इतकंच नव्हे, तर काही चाहत्यांनी फोटोच्या कमेंटमध्येच समंथाबाबत काळजी व्यक्त केल्याचंही पाहायला मिळालं. नात्यांमध्ये आलेलं हे वादळ पाहता आता समंथा यातून सावरत पुन्हा एकदा तिच्या कमावर कशा पद्धतीनं लक्ष केंद्रीत करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.