समंथासोबतच्या नात्यात अपयश मिळाल्यानंतर नागा चैतन्यकडून नव्या नात्याची कबुली?

कोण आहे ती?

Updated: Aug 3, 2022, 10:04 AM IST
समंथासोबतच्या नात्यात अपयश मिळाल्यानंतर नागा चैतन्यकडून नव्या नात्याची कबुली?  title=
south indian actor Naga Chaitanya hints relationship with shobhita dhulipala rumors arised

मुंबई : ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या सेलिब्रिटी जोडीनं घटस्फोट घेतला. नात्यातून विभक्त होत असल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून जाहीर केली. हे नातं एकाएकी तुटणं हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. नात्यात आलेल्या या अपयशानंतर आता कुठे ते दोघंही सावरताना दिसत आहेत. (south indian actor Naga Chaitanya hints relationship with shobhita dhulipala rumors arised)

सूत्रांच्या माहितीनुसार समंथा तिच्या करिअरमध्ये व्यग्र असतानाच नागा चैतन्य मात्र त्याच्या आयुष्यात प्रेम परतल्यामुळे बराच चर्चेत आला आहे. असं म्हणतात की, नागा चैतन्य 'मेड इन हेवन' फेम अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिला डेट करत आगे. 

नेमकं प्रकरण काय ? 
हल्लीच एका मुलाखतीमध्ये नागानं त्याच्या आणि शोभिताच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलं. मुलाखतीदरम्यान जेव्हा शोभिताच्या नावाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजब हास्य आलं. 

परिस्थिती सावरून नेत आपण फक्त या प्रश्नावरच हसत असल्याचं तो सारवासारव करत म्हणाला. साधारण महिन्याभरापूर्वी समोर आलेल्या माहितीमध्ये शोभिताला नागा चैतन्यच्या घरी पाहिलं गेलं होतं. यावेळी एकमेकांसोबत ते सहजपणे वावरतनाना दिसले. 

Naga Chaitanya | Zee News

बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत अभिनेता 
दाक्षिणात्य कलाजगत गाजवणारा हा अभिनेता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. आमिर खान आणि करीना कपूर यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून तो झळकणार आहे. आमिरसाठी ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या चित्रपटात नागा चैतन्यचीही वर्णी असल्यामुळं त्याच्या या पदार्पणाची उत्सुकता चाहत्यांनाही लागली आहे.