दाक्षिणात्य अभिनेत्री हेमा यांना अटक; CCB नं जप्त केले 5 प्रकाचे ड्रग्स, रेव्ह पार्टीत उपस्थित होते 130 पाहुणे

Actress Hema Arrested  : अभिनेत्री हेमा यांना रेव्हा पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 4, 2024, 12:43 PM IST
दाक्षिणात्य अभिनेत्री हेमा यांना अटक; CCB नं जप्त केले 5 प्रकाचे ड्रग्स, रेव्ह पार्टीत उपस्थित होते 130 पाहुणे title=
(Photo Credit : Social Media)

Actress Hema Arrested  : बंगुळुरु रेव पार्टी प्रकरणात सेंट्रल क्राइम ब्रांचनं सोमवारी चौकशी केली. त्यानंतर तेलगू चित्रपट अभिनेत्री हेमाला अटक केली आहे. 19 मे रोजी इलेक्ट्रॉनिक सिटीच्या जवळ असलेल्या एका फार्महाऊसमध्ये रेव पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सेंट्रल क्राइम ब्रांचनं सोमवारी हेमा यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळख लपवण्यासाठी त्यांनी बुर्का परिधान केला होता आणि त्या चौकशीसाठी आल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या जबावात हवी ती उत्तर न मिळाल्यानं त्यांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिस स्टेशनच्या बाहेर मीडियाशी बोलत असताना हेमा यांनी सांगितलं 'मी काही केलं नाही. मी निर्दोष आहे. ते माझ्यासोबत काय करत आहे तुम्ही पाहिलंत का? मी ड्रग्स घेतले नाही. मी हा व्हिडीओ हैदराबादमधून शेअर केला आहे. बंगळुरुमधून नाही. मी हैदराबादमध्ये बिर्यानी बनवताना एक व्हिडीओ शेअर केला होता.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सीसीबी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्मदिनच्या पार्टीच्या नावावर रेव पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जिथे जास्त लोक हे शेजारील राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगनामधून आले होते. त्यांनी सांगितलं की बंगलुरुमधून काही लोक होते. मिळालेल्या एका सुचनेनुसार, सीसीबीनं जागो-जागी छापे मारले आणि पार्टीमध्ये सहभागी असलेल्या लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले. पोलिसांच्या सुत्रांनुसार ही माहिती समोर आली होती की ब्लड रिपोर्टमध्ये पुष्टी झाली की हेमा यांच्यासह 86 लोकांना अंमली पदार्थांच्या सेवनानं संसर्ग झाल्याचे आढळले.

सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, पार्टीत एकूण 103 लोक उपस्थित होते. यांच्यात 73 पुरुष आणि 30 महिला सहभागी होत्या. पोलिसांनी टाकलेल्या छाप्या दरम्यान, 1.5 कोटी एमडीएमए (एक्स्टसी) गोळ्या, एमडीएमए क्रिस्टल, हायड्रो कॅनबिस, कोकेन, हाय-एन्ड गाड्या, लाइट्ससोबत डीजे देखील जप्त करण्यात आलं. 

हेही वाचा : वरुण धवननं लेकीच्या जन्मानंतर केली पहिली पोस्ट, 'हरे राम, हरे कृष्ण' लिहत शेअर केला 16 सेकंदाचा क्यूट व्हिडीओ

गेल्या सोमवारी हेमानं मीडियाला एक व्हिडीओ दिला. ज्यात त्यांनी दावा केला की त्यांचं नाव कोणतंही कारण नसताना या प्रकरणात घेण्यात आलं आहे आणि ती हैदराबादच्या बाहेर असलेल्या एका फार्महाऊसमध्ये होती. हेमानं दावा केला की तिला त्याच्या कथित अटकेसंबंधीत विचारायला पत्रकारांचे फोन येत होते. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत त्यांना उगाच अडकवल्याचं सांगितलं. त्याशिवाय ती म्हणाली की 'मी कुठे गेलेच नव्हते. मी हैदराबादमधअये एका फार्महाऊसमध्ये एन्जॉय करत होते आणि रिलॅक्स करत होती. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका. मला माहित नाही की त्या पार्टीत कोण आहे ही खोटी गोष्ट बातमी आहे. मी मंगळवारील घरीच जेवणं बवनत एक व्हिडीओ शेअर केला.'