बापरे! Diet Plan मुळे 'या' अभिनेत्याच्या पत्नीचं निधन!

डायट करणं पडू शकतं महागात...

Updated: Nov 2, 2022, 02:33 PM IST
बापरे! Diet Plan मुळे 'या' अभिनेत्याच्या पत्नीचं निधन! title=

मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असो की साऊथ इंडस्ट्री, सगळीकडून सतत वाईट बातम्या ऐकायला मिळतात. एकामागून एक मृत्यू होत आहेत हे इंडस्ट्रीचे लक्ष कोणी वेधून घेतले माहीत नाही. दाक्षिणात्य अभिनेता भरत कल्याण हा दिवंगत प्रसिद्ध कन्नड, तेलगू, तामिळ अभिनेता कल्याण कुमार यांचा मुलगा आहे. जरी त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केले असले तरी तो एक टेलिव्हिजन अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानं अपूर्व रंगल, वंशम आणि जमीला या मालिकांमध्ये काम केलं आहे. जी सध्या कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होत आहे. नुकतेच या अभिनेत्याच्या पत्नीचे निधन झाले आहे.

भरत कल्याण यांची 43 वर्षीय पत्नी प्रियदर्शिनी (South Actor Bharath Kalyan S Wife Priyadarshini) यांचे काही आठवडे कोमात राहिल्यानंतर सोमवारी पहाटे ५ वाजता निधन झाले. असे म्हटले जाते की काही महिन्यांपूर्वी त्यांनी पॅलियो डायट फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या खाण्याच्या सवयींमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे तिच्या रक्तातील साखरेमध्ये मोठी वाढ झाली, जी तिच्या मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले जाते.

South Actor Bharath Kalyan S Wife Priyadarshini Died At The Age Of 43 With Because Of Paleo Diet

तीन महिन्यांपूर्वी तिला चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा प्रियदर्शिनीची प्रकृती चिंताजनक होती. नंतर ती कोमात गेली आणि पुन्हा शुद्धीवर आली नाही. उद्या तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. तिच्या मागे पती, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.