भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन सौदीच्या मुसलमान गायकाने केले असे काही..VIDEO होतोय व्हायरल.

हा व्यक्ती  सौदी अरेबियाचा असून त्याचे नाव हाशिम अब्बास असल्याचे कळतंय.. 

Updated: Aug 22, 2022, 05:14 PM IST
भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन सौदीच्या मुसलमान गायकाने केले असे काही..VIDEO होतोय व्हायरल.   title=

SOUDI MUSLIM SINGER SING INDIAN SONG: सोशल मीडियावर दररोज बरेच व्हिडीओ वायरल होत असतात त्यातल्या बऱ्याच व्हिडीओंना फार प्रसिद्धी मिळते. नुकताच एक व्हिडीओ पुन्हा वायरल झाला आहे आणि त्याची  बरीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे  समस्त भारतीय या व्हिडिओची प्रशंसा  करताना दिसत आहेत .

कलेला धर्म नसतो असं म्हणतात आणि त्याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडिओ आहे,एका विदेशी गायकाने भारताचे गुणगान करणारं एक गाणं म्हणत भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला  ज्यामध्ये तो 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा' गाताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि लोक तो खूप शेअर करत आहेत. हे गाण गायलेला गायक सौदी अरेबियाचा असून त्याचे नाव हाशिम अब्बास असल्याचे कळतंय. हाशिम अब्बासचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आठवडाभरात लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि सोशल मीडियावर शेअर केला. 

हाशिम अब्बासने असा व्हिडिओ अपलोड करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा हाशिम ने भारताप्रती आपलं प्रेम व्यक्त करत भारताचं राष्ट्रगीत गायलं आहे , हाशिमने 26 जानेवारी 2021 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तो भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गाताना दिसत आहे.

 नुसतं हशिमच नाही तर अनेक परदेशी गायकांनी याआधी भारताप्रती प्रेम दाखवत भारताची गाणी गायली आहेत भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पाकिस्तानी संगीतकार रबाब भारताचे राष्ट्रगीत वाजवताना आणि त्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ अपलोड केला होता ज्याला देखील तुफान प्रसिद्धी मिळाली.