Sara Ali Khan ची कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदत, Sonu Sood कडून कौतूक

सोनू सूद फाऊंडेशनला सारा अली खानने दिली मदत

Updated: May 8, 2021, 10:37 PM IST
Sara Ali Khan ची कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदत, Sonu Sood कडून कौतूक title=

मुंबई : देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाने थैमान घातलं असताना अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट सगळ्यांनाचा त्रासदायक ठरत आहे. त्यात बॉलिवुड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) दररोज कोणाची तरी मदत करताना दिसतोय. त्याच्या या कामात आता अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ने देखील हातभार लावला आहे.

आज सोनू सूद (Sonu Sood) ने आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत खुलासा केला. त्याने सारा अली खानचं कौतूक केलं. सारा अली खानने त्याच्या फाउंडेशनसाठी मदत केल्याचं सोनू सूदने सांगितलं. 'तू चांगलं काम करत आहेस. याचा मला अभिमान आहे. तू युवा आहेस आणि या कठिन काळात देशाची मदत करत आहेस. तू सगळ्यांना प्रेरणा देत आहेस.'

सोनू सूदच्या या ट्विटनंतर सगळ्यांनीच सारा अली खानचं कौतूक केलं. सारा अली खान देखील सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे. लोकांसाठी ती मदत मागत आहे.

सोनू सूद शिवाय सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, विराट कोहली सारखे सेलिब्रटी देखील या कठीण काळात देशासाठी पुढे आले आहेत. ते देखील लोकांना मदत करण्यासाठी काम करत आहेत.