सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ

सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद प्रसिद्ध आहे. सोनू सूद सध्या पंजाब मध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिससोबत मॅग्नम ऑपस फतेहचं शूटिंग करत आहे 

Updated: Apr 3, 2023, 08:49 PM IST
सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ-स्क्रीन सोनू सूद त्याच्या चाहत्यांसाठी रिअल हिरो आहे. एमटीव्ही रोडीज बऱ्याच दिवसांपासून चालत आलेला शो आहे. आणि सगळ्यात पाहिला जाणारा हा शो आहे. एमटीव्ही रोडीजची यूथ फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे. बरेच लोकं रोडीचं स्वप्न पाहातात. अशामध्ये एमटीव्ही रोडीज यूथचं स्वप्न पुर्ण करण्यात मदत करतं. हा मंच टॅलेंट दाखवण्यासाठी आहे.  
  
सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद प्रसिद्ध आहे. सोनू सूद सध्या पंजाब मध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिससोबत मॅग्नम ऑपस फतेहचं शूटिंग करत आहे आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावरून  रोडीजच्या नवीन सीझनची खास घोषणा केली आहे. त्याने पोस्ट च्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, तुम्ही खूप वाट पाहिली, आता नोट करा ही डेट. अजिबात करु नका लेट कारण हे ऑडिशन चमकवू शकतं तुमचं नशिब तयार व्हा ! #MTVRoadiesAudition कारण आम्ही येतोय लवकरच तुमच्या शहरात! 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनू सूद  त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. अमृतसर, पंजाब सारख्या ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारे स्टंट करून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. ज्याने प्रेक्षकांच्या समोर प्रत्यक्षपणे स्टंट केले. फतेह मध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवज्योती राजपूत आणि विजय राज सुद्धा वेगळ्या भूमिकेत आहेत. हॉलिवुडची अनेक नाव दिग्दर्शन आणि फोटोग्राफी, रिसर्च टीम,कोरीयोग्राफर साठी उत्कृष्ट नाव असल्याचं समजतंय. वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट येणार आहे.

सोनू सूदने यापूर्वी एमटीव्ही रोडीज सीझन 18 होस्ट केला आहे. आता नवीन सीझनमध्येही सोनू सूद होस्ट म्हणून दिसणार आहे. या सीझनमध्ये अनेक खतरनाक स्टंटही पाहायला मिळणार आहेत. काही टास्क असतील जे दर्शकांसाठी पूर्णपणे नवीन आणि खास असतील.